Wedding video viral: सोशल मीडियावर लग्नातील किंवा नवरदेव नवरीचे कित्येक व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. लग्नातील कार्यक्रम, निरनिराळ्या प्रथा आणि मस्ती हे कोणाचाही दिवस चांगला बनवतात. दरम्यान एका अमेरिकन नवरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अमेरिकेची लेक आता भारताची सून होणार आहे. यावेळी लग्न लागताना नवरीची होणारी घालमेल कॅमेरात कैद झाली असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हल्ली अशी अनेक लग्न तुम्ही पाहिली असतील. लग्नातील प्रत्येक क्षण फोटो आणि व्हिडिओच्या स्वरुपात कैद करण्याचा ट्रेंडही सध्या हिट झाला आहे. अनेक लग्नांमध्ये नवरी आणि नवरदेव या दोन्ही घरातील लोकांकडून वेगवेगळे फोटोग्राफर बोलवले जातात. यामुळे लग्नातील एकही क्षण मिस होत नाही. सध्या एका लग्नसमारंभातील असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पारंपारिक पद्धतीनं भारतीय संस्कृतीप्रमाणे हे लग्न पार पडत आहे. यावेळी नवरा आणि नवरीच्यामध्ये अंतरपाट धरला आहे. मात्र अमेरिकेच्या नवरीला लग्न लागेपर्यंत काही धीर नाही. यावेळी ती आपल्या होणाऱ्या नवऱ्याला अंतरपाटातून गुपचूप बघत असल्याचं दिसत आहे. अमेरिकन नवरी अंतरपाठ मधून आपल्या नवऱ्याला चोरून बघते आहे. विशेष म्हणजे ती तिच्या पेहरावामुळे अधिकच चर्चेत आली आहे. नवरीनं पारंपारीक पद्धतीनं नऊवारी साडी घातलेली आहे. तसेच गळ्यात पारंपारीक दागीणेही, मुंडवळ्या बांधल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेची नवरी फारच आकर्षित दिसत आहे.

भारतीय रितीरिवाजाप्रमाणे लग्नसोहळा संपन्न

या लग्न सोहळ्याला बाहेरच्या पाहुण्यांनी आणि नवरीच्या नातेवाईकांनी हजेरी लावली होती. भारतीय रितीरिवाजाप्रमाणे हा लग्नसोहळा पार पडला. पराराष्ट्रातील पाहुण्यांनी यात भाग घेऊन या लग्नसोहळ्याचा आनंद लुटला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “तुझ्यासारखा मुलगा कुणाला मिळू नये, माझ्या आयुष्यातून निघून जा” तरुणीनं बॉयफ्रेंडला चालू मेट्रोत कानफटवलं

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरीही व्हिडीओला पसंती देत आहेत. हा व्हिडीओ marathi_weddingz नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४ हजार १९७ लाइक्स आणि लाखोंमध्ये व्ह्युज मिळाले आहेत. तसेच व्हिडीओवर नेटकरी भरभरुन कमेंट करत आहेत.

एका युजरने कमेंट केलीय की, “आता ही परिस्थिती आहे मग पूर्वीच्या मुलींची अवस्था काय होती असेल याचा विचार करा जिला तिचा होणारा नवरा शेवटपर्यंत दाखवला जायचा नाही.”