सुखोई लढाऊ विमानांसह चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची 'नारी शक्ती' सज्ज, IAF ची पहिली महिला टीम चीनच्या सीमेवर तैनात| amid growing women power in IAF female officers flying fighter jets choppers near lac faceoff india china in north east | Loksatta

सुखोई लढाऊ विमानांसह चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची ‘नारी शक्ती’ सज्ज, IAF ची पहिली महिला टीम चीनच्या सीमेवर तैनात

भारताच्या शूर मुली आता चीन सीमेवर लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर उडवत आहेत. ईशान्येत ‘स्त्रीशक्ती’ची ताकद दिसून येत आहे. सियाचीन ग्लेशियरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत या महिला वैमानिकांची ताकद आणि बुद्धिमत्ता अतुलनीय आहे.

सुखोई लढाऊ विमानांसह चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची ‘नारी शक्ती’ सज्ज, IAF ची पहिली महिला टीम चीनच्या सीमेवर तैनात
photo(ani)

जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीन( Siachen) असो, किंवा अरुणाचल प्रदेशातील धोकादायक डोंगराळ प्रदेश असो भारतीय वायुसेनेच्या महिला वैमानिक आपल्या सामर्थ्याने देशाची मान उंचावत आहेत. भारतीय हवाई दलात सध्या १३०० महिला अधिकारी ग्राउंड आणि एअर ड्युटी करत आहेत. सीमेवर सैनिकांना मदत करणाऱ्या या वीरांची कहाणी काय आहे ते जाणून घेऊया. 

सुखोई Su-30MKI फायटर जेटचे पहिले वेपन सिस्टम ऑपरेटर फ्लाइट लेफ्टनंट तेजस्वी यांनी सांगितले की, आमच्या सैन्यात एका पेक्षा एक हुशार महिला आहेत, ज्यांनी जुन्या समजुती मोडल्या आहेत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. मुलींना स्वप्न बघायला शिकवले आहे. देशासाठी काहीही करण्याची हिंमत आहे. लवकरच महिलाही फायटर जेटच्या ताफ्यात दिसणार आहेत. पुरुष आणि महिलांसाठी प्रशिक्षण समान आहे. आम्ही समान आहोत. मग ते आकाश असो की जमिनीवरचा आधार. सर्वप्रथम आपण ‘एअर वॉरियर्स’ आहोत, बाकी सर्व काही यानंतर येते. 

( हे ही वाचा: Video: गावातील माणसाने ट्रकला बनवला चालता फिरता लग्नमंडप हॉल; आनंद महिंद्रा म्हणाले ‘मला भेटायचे आहे…’)

( हे ही वाचा: वनकर्मचाऱ्यांनी घडवून दिली हरवलेल्या हत्तीच्या पिल्लाची आईशी भेट; माता हत्तीने देखील दिला सोंडेने आशीर्वाद)

भारतीय हवाई दलाने सर्वाधिक तीन मुलींचा फायटर स्ट्रीममध्ये समावेश केला होता. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि शिवांगी सिंग या तीन मुली आहेत. नंतर जेव्हा कांतने मिग-21 एकट्याने उडवून नाव कमावले तेव्हा शिवांगी सिंग राफेल फायटर जेटची पायलट बनली. फ्लाइट लेफ्टनंट अनी अवस्थी आणि ए नैन अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेजवळील LAC च्या आजूबाजूच्या घनदाट जंगलात ALH ध्रुव हेलिकॉप्टर उडवत आहेत. ईस्टर्न कमांडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या महिला हवाई योद्धा आपल्यासाठी उत्तम काम करत आहेत. तसेच आपली विमाने खूप छान उडवतात. त्यांची काळजी घेतात.

लष्करातील महिलांचे सामर्थ्य पुढे नेण्याची सरकारची योजना आहे. अग्निवीर योजनेंतर्गत भरती करण्याचीही तयारी सुरू आहे. इंडिया टुडेशी बोलताना फ्लाइट लेफ्टनंट तेजश्वी म्हणाले की, भारतीय हवाई दलातील प्रत्येक वैमानिकाला काही ना काही ऑपरेशन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. आम्ही पूर्व आणि ईशान्येकडील प्रदेशात फिरतो. आम्ही कोणत्याही प्रकारच्या आव्हानासाठी किंवा कार्यासाठी नेहमीच तयार असतो. तेजस्वी Su-30MKI फायटर जेटच्या मागील कॉकपिटमध्ये बसली आहे. तिथून ती त्याचे सेन्सर आणि शस्त्रे पॅनेल हाताळते. 

( हे ही वाचा: धगधगता ज्वालामुखी आणि त्यावरती दोरीवर चालणारी दोन मुलं…आयुष्यात इतकं भयानक दृश्य कधीही पाहिलं नसेल)

तेजस्वी सांगते की, ऑपरेशनच्या वेळी आपण जे काम करतो, तेच काम आपल्याला ट्रेनिंगमध्ये सतत शिकवले जाते. म्हणूनच ऑपरेशन किंवा मिशन नेहमी आपल्या मनात चालू असते. त्याच वेळी, सेकंड फ्लाइट लेफ्टनंट सख्या बाजपेयी म्हणाले की जेव्हा संयुक्त ऑपरेशन केले जाते. किंवा असे वॉरगेम्स आहेत, ज्यामध्ये उड्डाण करणे हे एखाद्या थरारापेक्षा कमी नाही. वास्तविक युद्धादरम्यान कसे वागावे हे आपण येथेच शिकतो. सतत प्रशिक्षण मोहिमांमध्ये सहभागी होऊन, प्रतिकूल परिस्थितीत आपण स्वतःला कसे टिकवून ठेवू शकतो हे यातून दिसून येते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Viral : श्वानाने मित्राला नदीत बुडण्यापासून वाचवले, पण व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या ‘या’ शंका

संबंधित बातम्या

संतापजनक! शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत भोजपूरी गाण्यावर थिरकली, शाळेतील Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, “शिक्षक आयटम डान्सर नाहीत…”
माकड करतंय टायपिंग, त्याच्या मेंदूमध्ये बसवलीय चिप… काय आहे एलॉन मस्क यांच्या डोक्यात?
Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
“मी जाड असल्याचा फोटो…” कान्ये वेस्टचं ट्विटर अकाउंट निलंबित केल्यावर एलॉन मस्क यांचा मोठा खुलासा
नाद करायचा नाय! ‘कुत्ता समझा क्या’, सिंहांच्या कळपासोबत मस्ती करणाऱ्याला अद्दलच घडली, पाहा अंगावर शहारा आणणारा Viral Video

व्हिडिओ

ताज्या बातम्या
धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण असू शकतो? यावर सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा
ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या
“दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट
तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही