माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी तसेच गायिका अमृता फडणवीस या सोशल नेटवर्किंगवर चांगल्याच सक्रीय असतात. कधी अप्रत्यक्षपणे राजकीय परिस्थितीवर केलेलं भाष्य तर कधी त्यांच्या गाण्यांमुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा असल्याचं दिसून येत. कालपासून अमृता पुन्हा चर्चेत असण्यामागील कारणही त्याचं नवं गाणं आहे. ‘मानिके मागे हिते’या श्रीलंकन गाण्याचं हिंदी वर्जन अमृता यांनी गायलं आहे. कालच या गाण्याचा व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन शेअर केलाय.

श्रीलंकन ​​गायक योहानी डिलोका डी सिल्वाने गायलेलं हे गाणं जगभरामध्ये धुमाकूळ घालत असतानाच अमृता यांनी याच गाण्याच्या चालीवर त्याचं हिंदी व्हर्जन गायलं आहे. या गाण्यामध्ये अमृता यांनी एका पॅचमध्ये रॅप साँग पद्धतीचं गायनही केलं आहे. “सध्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणामद्ये थोडं चील-पील व्हा या कूल गाण्यासोबत,” अशा कॅप्शनसहीत अमृता यांनी हे गाणं शेअर केलं आहे. मात्र या गाण्यावरुन अमृता यांना ट्रोल केलं जात आहे. अमृता यांनी ट्विटरवरुन या गाण्याची लिंक शेअर करताना त्याच्यावर कोणाला कमेंट्स करता येणार नाही याची काळजी घेतली आहे.

big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड
Attack on hotel businessman
आपटे रस्त्यावर हॉटेल व्यावसायिकावर हल्ला करणारे गजाआड; संपत्तीच्या वादातून मेहुण्याकडून मध्य प्रदेशातील पहिलवानांना सुपारी

फेसबुकवर या गाण्याच्या व्हिडीओवर अनेक कमेंट्स आल्या असून काहींनी कौतुक केलंय तर काहींनी अमृता यांना ट्रोल केलंय. मात्र व्हिडीओ खालील बऱ्याच कमेंट्स या ट्रोल करणाऱ्या कमेंट्स आहेत. काहींनी पुरुष दिनाच्या दिवशी हे ऐकावं लागल्याबद्दल कमेंट केलीय तर काहींनी तुम्ही गायिका असल्याने अशापद्धतीने एखाद्या गाण्याचं हिंदी व्हर्जन गाण्याऐवजी नवीन गाणी गायली पाहिजेत असा सल्ला दिलाय. पाहुयात काही मोजक्या कमेंट्स…

मुंबईतील नदी संवर्धनासाठी यापूर्वी अमृता यांनी गाणं गायलं आहे. त्याचबरोबरच अमृता यांनी तिला जगू द्या हे स्त्री भ्रूणहत्या रोख्यासंदर्भातील जनजागृती करणारं गाणंही यापूर्वी गायलेलं आहे.

‘मानिके मागे हिते’बद्दल…
योहानीने श्रीलंकन गायक आणि संगीतकार सतीशनसोबत गायलेलं ‘मानिके मागे हिते’ गाणं युट्यूबवर २२ मे २०२१ रोजी अपलोड करण्यात आलं होतं. या गाण्याला सर्वच देशांमधून उत्तम प्रतिसाद मिळाल्याने ते जगभरामध्ये चर्चेत आलं. टिक-टॉक आणि इन्स्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटींनी या गाण्यावर रिल्स शूट केल्याने हे गाणं अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहचलं. या गाण्याला युट्यूबवर ७५ मिलियनहून अधिक व्ह्यूज आहेत.