पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्क्रोल करत असताना आपल्या दृष्टीक्षेपात पडतात. अनेकदा असे व्हिडीओ क्लिक केल्याशिवाय पुढे जाण्याचं मन करत नाही. कारण पाळीव प्राण्यांच्या गंमतीजमती पाहण्याचा आनंद काही औरच असतो. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करताना किंवा फावल्या वेळेत असे व्हिडीओ आवडीने पाहिले जातात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. यात एक कुत्रा स्वत:चं प्रतिबिंब आरशात पाहिल्यानंतर आक्रमक होतो. भटक्या कुत्र्यांची त्यांच्या परिसरातील टोळी असल्याचे अनेकदा दिसून आलं आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या परिसरात इतर कुत्रे आलेलं सहन होत नाहीत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका इमारतीच्या पार्किंग एरियामध्ये राहणारा कुत्रा अचानक पार्क परिसरात लावलेल्या आरशात स्वत:ला पाहतो. त्यानंतर त्याला आपल्या परिसरात दुसरा कुत्रा आला आहे, असं वाटतं.

कुत्र्याला कळत नाही की ते आपलंच प्रतिबिंब आहे. दुसरा कुत्रा आपल्या भागात आल्याचं भास होतो आणि आरशात दिसलेल्या कुत्र्यावर जोरात भुंकतो. त्याला हाकलण्यासाठी आरशाच्या मागे जाताना दिसतो. यानंतर तो पुन्हा आरशासमोर येऊन स्वतःवरच भुंकताना दिसतो. पुन्हा एकदा कुत्रा दुसऱ्या कुत्र्याला पाहण्यासाठी आरशाच्या मागे जातो. पण शेवटी कुत्रा काही केल्या हाती लागत नसल्याचं पाहून उदास होतो. सध्या या कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले असून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच या व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.