scorecardresearch

Premium

VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण

देव तारी त्याला कोण मारी; विजेचा धक्का बसलेल्या चिमुकल्याला वयोवृद्धाने वाचवलं, व्हिडीओ व्हायरल

elders saved the child slife Varanasi Viral Video
वृद्धांच्या प्रयत्नांमुळे वाचले मुलाचे प्राण. (Photo : Twitter)

सध्या सोशल मीडियावर वाराणसीमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रस्त्यावर पाणी तुंबल्याचं दिसत असून अनेक लोक पाण्यातून ये-जा करत आहेत. या वेळी विजेच्या खांबातून पाण्यात पसरलेल्या विद्युत प्रवाहामुळे एका चिमुकल्याला विजेचा धक्का बसल्याचं दिसत आहे. विजेचा धक्का लागल्याने तो जमीनीवर तडफडत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तर या मुलाच्या मदतीसाठी दोन वयस्कर व्यक्ती देवदूत बनून आल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. व्हायरल व्हिडीओतील दृश्य खूप थरारक आणि अंगावर काटा आणणारं आहे.

व्हिडीओत विजेचा धक्का बसल्यामुळे लहान मुलगा जमिनीवर कोसळतो यावेळी एक वयस्कर व्यक्ती त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडीओतील वृद्ध सुरुवातीला मुलाजवळ जाताच त्यांनाही विजेचा धक्का बसतो. यावेळी आणखी एक वयस्कर व्यक्ती तिथे येऊन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू करते. पाण्यात करंट उतरल्यामुळे त्यांना मुलाजवळ जाता येत नसल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. यावेळी एक व्यक्ती या वृद्धाच्या हातात लाकडी काठी देतो. तिच काठी ते मुलाच्या हातात देतात आणि त्याला पाण्यातून बाहेर ओढतात.

funny video
Video : चिमुकल्याने चक्क झोपेत केली मध्यरात्री ३ वाजता गणपतीची आरती; मजेशीर VIDEO एकदा पाहाच
buldhana, amboda village, snake rescue, farm
पाईपातून आलेल्या आवाजाने ‘नारायण’ची बोबडी वळली…‘श्रीरामा’ने धाव घेत केले संकटमुक्त; पहा थरारक व्हिडिओ
kbc
KBC: हिरोशिमावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याबद्दल विचारल्या गेलेल्या १ कोटींच्या प्रश्नावर स्पर्धक अडखळला, तुम्ही याचं उत्तर देऊ शकता का?
Elephant Attacks A Man Video Viral
रिक्षा घेऊन जंगल सफारी करणाऱ्याला जन्माची अद्दल घडली, पिसाळलेल्या हत्तीने केलं असं काही…Video पाहून धडकी भरेल

हेही वाचा- माजी विद्यार्थ्याचा अनोखा पराक्रम! ज्या शाळेत शिकले त्याच शाळेची जमीन विकली, संपूर्ण प्रकरण वाचून डोकंच धराल

वृद्धांच्या प्रयत्नांमुळे वाचले मुलाचे प्राण –

व्हिडीओमध्ये, विजेच्या धक्क्यामुळे मुलाच्या हातातील लाकडी काठी सुरुवातीला खाली पडल्याचं दिसत आहे. पण पुन्हा तो काठी पकडतो आणि आजोबा त्याला पाण्यातून सुखरुप बाहेर काढतात. या दोन वृद्धांनी मुलाचे प्राण वाचवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी दोन्ही वयस्कर व्यक्तींचे खूप कौतुक करत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

एका व्यक्तीने लिहिलं, “माझ्या बनारस शहरात असे चांगले लोक आहेत जे स्वत:च्या जीवाला धोका असूनही इतरांचे प्राण वाचवण्यासाठी धावून जातात.” रवी नावाच्या एका ट्विटर यूजरने लिहिलं, “नाही नाही, हे वाराणसी नाही. वाराणसी हा पंतप्रधानांचा संसदीय मतदारसंघ आहे. अशी घटना तिथे घडू शकत नाही.” संकेत उपाध्याय यांनी लिहिलं, “देवदूत आहेत. ते आपल्या आजूबाजूला असतात. या वृद्धांना माझा विनम्र अभिवादन.” हे प्रकरण चेतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याची माहिती समोर आली आहे. तर या घटनेनंतर वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. तर मुलाचे कुटुंबीय म्हणाले, “दोन्ही वयस्कर व्यक्ती देवदूतांसारखे धावून आले आणि मुलाचे प्राण वाचवले. त्यांचे मनापासून आभार”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: An elderly man saved a small child who was electrocuted the varanasi video viral on social media jap

First published on: 27-09-2023 at 15:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×