उत्तर प्रदेशातील शामली येथे पोलीस आणि वीज विभाग यांच्यात अनोखी लढत पाहायला मिळाली. येथे विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याने पोलिसांवर सूड उगवण्यासाठी पोलिस ठाण्याची वीज खंडित केली. त्याचं झालं असं, शामली येथील एका वाहतूक पोलिसाने इलेक्ट्रिशियनने चलान कापले होते. यामुळे संतप्त इलेक्ट्रिशियनने ५६ हजारांचे वीज बिल थकवणाऱ्या पोलीस ठाणेची वीज कापली. इलेक्ट्रिशियनने पोलिस ठाण्याची वीज कापल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

असे सांगण्यात येत आहे की, पॉवर हाऊसमध्ये तैनात मेहताब याचे चलान पोलिसांनी कापले. चारथावळ तीनराह येथे तपासणीदरम्यान पोलिसांनी मेहताबला ६ हजार रुपयांचे चलन ठोठावले. या इलेक्ट्रिशियनने पोलिसांना सांगितले की तो पॉवरहाऊसमध्ये काम करतो आणि तो आता तिथूनच येत आहे. तरीही पोलिसांनी त्याचे चलन कापले. या गोष्टीमुळे चिडलेल्या इलेक्ट्रिशियनने पोलीस ठाण्याचीच वीज कापली.

मैत्रिणीसोबत कारमध्ये सापडलेल्या भाजपा नेत्याला बायकोने रस्त्यावरच चप्पलने झोडपलं; Video होतोय व्हायरल

इलेक्ट्रिशियनने पोलिस स्टेशनची वीज तोडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शामली येथील ठाणेभवन पोलीस ठाण्याच्या बाहेर लावण्यात आलेल्या विद्युत खांबावरून इलेक्ट्रिशियन पोलीस स्टेशनचे कनेक्शन तोडत असल्याचे व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो. व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची चौकशी केली असता कंत्राटी कामगार मेहताब याने पोलिस ठाण्याच्या वीज खंडित केल्याची संपूर्ण कहाणी सांगितली.

कंत्राटी कामगार मेहताबने सांगितले की, त्यांचा पगार फक्त पाच हजार रुपये आहे आणि पोलिसांनी त्याचे ६००० रुपयांचे चलन कापले. लाईन तपासून तो मोटारसायकलवरून येत असल्याचे मेहताब याने सांगितले. यावेळी त्याने हेल्मेट घातले नव्हते. नंतर वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवून हेल्मेटबद्दल विचारले. यावर तो पोलिसांना म्हणाला की तो वीज तपासून येत असल्यामुळे घाईघाईत हेल्मेट आणायला विसरला. यापुढे हेल्मेट वापरणार आणि वाहतुकीचे नियमही पाळणार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

एक वर्षाच्या बाळाला खांद्यावर घेऊन बापाला चालवावी लागतेय रिक्षा; Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स

मात्र, विद्युत विभागाचे अधिकारी लूट करतात, असे म्हणत पोलिसांनी मेहताबचे चलन कापले. तुम्ही जास्त बिले पाठवता आणि तुम्ही विद्युत कर्मचारी आहेत तर नक्कीच चलन कापले जाईल, असे पोलिसांनी त्याला म्हटले. मेहताब म्हणाला की त्याच्या समोर पोलिसांनी कित्येक लोकांना चलन न कापतात सोडून दिले.

इलेक्ट्रिशियन मेहताब याने सांगितले की, चलन कापल्यानंतर तो कार्यालयात आला असता त्याने पोलिस स्टेशनचे बिल थकीत असल्याचे पाहिले. त्यामुळे त्याने नियमानुसार पोलिस स्टेशनची लाईन कापली. वाहतूक पोलिसांचे ‘तुम्ही विद्युत कर्मचारी आहेत तर नक्कीच चलन कापले जाईल’ हे वाक्य सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे. पोलिसांच्या या कार्यपद्धतीमुळे विद्युत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्याचवेळी वीज कनेक्शन तोडल्याने पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे.