Emotional video of a delivery boy: सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर, तर काही व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवतात. असे व्हिडीओ आपल्याला आयुष्यात खूप गोष्टी शिकवून जातात. आपल्याकडे नसलेल्या गोष्टींकडे पाहून रडत बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींमध्ये समाधान कसं मानायचं हे अशा व्हिडीओकडे बघून कळतं.

जबाबदारी माणसाला सगळं काही शिकवते, असं म्हणतात. त्यात गरिबी वाट्याला आली की, मेहनत आणि अथक परिश्रमांशिवाय कुठलाच पर्याय उरत नाही. आपली पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक जण दररोज जीवाचं रान करतात आणि आपली भूक भागवतात; पण ज्या पोटासाठी कमवायचं, ते खायला वेळच नाही मिळाला तर. सध्या अशीच परिस्थिती एका डिलिव्हरी बॉयची झालीय; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न
Heart touching video of police who help poor man on road video goes viral
“शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा; VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Crab fight with tortoise shocking ending video viral on social media
“कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, कासवाला त्रास देणं खेकड्याला पडलं महागात; VIDEOचा शेवट पाहून विश्वास बसणार नाही
Traffic jam in pune city due rush for Diwali 2024 shopping Shocking video
पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल

हेही वाचा… धक्कादायक! पिसाळलेल्या बैलाचा आजोबांवर हल्ला; टोकदार शिंगांनी उडवलं अन्…, थरारक घटनेचा VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओत एक तरुण बाईक चालविताना दिसतोय. या तरुणानं पाठी भलंमोठं पार्सलचं ओझं घेतलेलं दिसतंय. त्यावरून हा तरुण डिलिव्हरी बॉय असल्याचं कळून येतंय. या व्हिडीओत तरुणानं सिग्नल लागला म्हणून गाडी थांबवली आहे. या दगदगीच्या आयुष्यात त्याला चार घास सुखाचे खायलादेखील मिळत नसल्याचं यातून कळतंय. सिग्नलला गाडी लावून तरुण पोटाची भूक भागविण्यासाठी त्या गाडीवरच तो आपलं अन्न खाऊ लागतो. खाता खाता त्याचं सिग्नलकडे लक्ष असतं. सिग्नल सुटेल तेव्हा गाडी काढायची म्हणून तो पटापट अन्न खाऊ लागतो.

https://www.instagram.com/reel/DBbOqW6hT4G/

हा व्हिडीओ @dpemotional या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून लडका होना इतना आसान नही होता है जनाब, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. या व्हिडीओला तब्बल ८ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांनी भावूक होत, आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “त्याला शांतपणे खाऊ द्या, कशाला त्याचा व्हिडीओ बनवताय.” तर दुसऱ्यानं “कोण म्हणतं की, मुलगा होणं सोप आहे.” अशी कमेंट केली. तिसऱ्यानं कमेंट करत लिहिलं, “जे लोक इतरांना वेळेवर अन्न पोहोचवतात, त्यांच्याकडेच अन्न खायला वेळ नाही”

हेही वाचा… “मॅडम, किती माराल…”, ‘या’ कारणामुळे महिलेने दिला तरुणाला चोप, लाथा बुक्क्यांनी मारलं अन्…, VIDEOमध्ये पाहा नेमकं काय घडलं?

दरम्यान, याआधीही डिलिव्हरी बॉयचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, जे पाहून अनेकांचे डोळे पाणावले असतील. सध्या व्हायरल झालेला तरुणाचा हा व्हिडीओही चर्चेत आहे.

Story img Loader