आजकाल सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मनोरंजन करणाऱ्या एकापेक्षा एक गोष्टी व्हायरल होत असतात. यामध्ये काही मनोरंजक व्हीडीओ असतात तर कधी विचित्र पद्धतीने छापलेली लग्नपत्रिका, तर कधी एखाद्या मुलाने शाळेत सुट्टी मिळावी म्हणून केलेला मजेशीर अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी पाहून नेटकऱ्यांच खूप मनोरंजन होत असतं. सध्या अशाच एका कर्मचाऱ्याने रजेसाठी केलेला अर्ज पाहून तुमचं मनोरंजन होणार यात शंका नाही.

हेही पाहा – वळू घराच्या छतावर गेला पण खाली यायचा रस्ता सापडेना, संतापून थेट रस्त्यावर उडी मारली अन्…

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या रजेच्या अर्जामध्ये एका कर्मचाऱ्याने वेब सिरीज पाहण्यासाठी सुट्टी मिळावी, अशी विचित्र मागणी केली आहे. आजपर्यंत कर्मचाऱ्यांनी आपल्या बॉसकडे आजारपणाच्या कारणामुळे, घरगुती कामांसाठी किंवा अचानक आलेल्या एखाद्या महत्वाच्या कारणानिमित्त रजेची मागणी केल्याचं पाहिलं आहे. शिवाय अशा कर्मचाऱ्यांची महत्वाची कारण बघून त्यांची रजाही मंजूर केली जाते.

हेही पाहा- पाळीव कुत्र्याच्या एका चुकीमुळे घर आगीत जळून खाक; मालकीन हेअर ड्रायर बेडवर ठेवून गेली अन्…

पण सध्या सोशल मीडियावर एका विचित्र प्रकारचा रजेचे अर्ज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका कर्मचाऱ्याने वेब सिरीज पाहण्यासाठी रजा मागितली आहे. त्यामुळे असा अनोखा अर्ज आजपर्यंत पाहिला नसल्याचं नेटकरी म्हणत आहेत. शिवाय या कर्मचाऱ्याच्या धाडसाचंही अनेकांनी कौतुक केलं आहे तर काहीजण या कर्मचाऱ्याला ट्रोल करत आहेत.

घरी बसून वेब सिरीज बघायची आहे –

ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये एका व्यक्तीने रजेच्या अर्जात “पिचर्स” नावाच्या वेब सिरीजचा नवीन सीझन पाहण्यासाठी सुट्टी हवी असल्याचं म्हटलं आहे. त्याने अर्जात लिहिले आहे की, ‘२३ डिसेंबरला सुट्टी घेण्यासाठी हा औपचारिक अर्ज आहे, जेणेकरून मला पिचर्स या बेव सिरीजचा दुसरा सीझन घरी बसून पाहता येईल. कामाच्या दिवसांमध्ये माझी आवडती वेब सिरीज पाहिल्याने माझ्या झोपेचे चक्र बिघडते आणि मी वीकेंडची वाट पाहू शकत नाही. त्यामुळे मी माझे काम २४ डिसेंबरपासून सुरू करेन.’

रजा अशी घ्यावी –

कर्मचाऱ्याच्या या अनोख्या रजेचा अर्ज अभिषेक नावाच्या पत्रकाराने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यांनी ट्विट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सुट्टी सामान्य करण्याची गरज आहे, फक्त आजारी असल्यावर किंवा काही कामांसाठीच सुट्टी घ्यावी हे गरजेचं नाही.’ सोशल मीडियावर या पोस्टवर विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, ‘कारण का सांगायचं, सुट्टी घेणं हा कर्मचाऱ्याचा अधिकार आहे आणि मॅनेजरला न विचारता देखील आपण सुट्टी घेऊ शकतो.