Viral Video : प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेकदा आपण आईविषयी बोलतो, तिच्याविषयी प्रेम व्यक्त करतो पण वडिलांविषयी फार व्यक्त होत नाही. आई इतकेच प्रेम, काळजी जिव्हाळा वडिलांमध्येही दिसून येतो. अनेकदा वडिलांना कठोर वागावे लागते पण याचा अर्थ हा नाही की ते तुमच्यावर प्रेम करत नाही. अनेकदा वडिल व्यक्त होत नाही आणि आपण सुद्धा त्यांच्याकडे प्रेम व्यक्त करायला घाबरतो. आयुष्यात वडिलांचे स्थान खूप मोठे आहे त्यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त करणे किंवा प्रेम व्यक्त करणे खूप गरजेचे आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वडिलांना कडकडून मिठी मारत काही विद्यार्थी रडताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Son Post Father marksheet
वडिल म्हणायचे, “पोरा परिक्षेत पास हो”, मुलानं वडिलांचीच दहावीची मार्कशीट केली व्हायरल; VIDEO पाहून व्हाल हसून लोटपोट
karma hit back on young boys who messed with the cow
Video : गायींबरोबर पंगा घेणे तरुणाला पडले चांगलेच महागात, थेट हवेत उडवले अन्…, व्हिडीओ होतोय व्हायरल
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
Love Jihad
व्हायरल होत असलेला लव्ह जिहादचा तो व्हिडीओ…
View this post on Instagram

A post shared by Vasant Hankare (@vasant_hankare555)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला काही विद्यार्थी दिसेल. शाळेतील ही मुले मुली त्यांच्या वडिलांना घट्ट मिठी मारताना दिसत आहे आणि रडत सुद्धा आहे. मुलांना रडताना पाहून त्यांचे वडील सुद्धा रडताना व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आवाज ऐकू येईल. या बापाला मिठी मार असे आवाहन करणारा आवाज या व्हिडीओत ऐकू येत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा आवाज कोणाचा आहे?
युवा व्याख्याता समाज प्रबोधनकार वसंत हंकारे यांचा हा आवाज आहे. या शाळेत वसंत हंकारे यांचे व्याख्यान असावेत आणि हा व्हिडीओ त्यांच्या व्याख्यानादरम्यानचा असावा, असा अंदाज आहे.तुम्हीही हा व्हिडीओ पाहाल तर तुम्हालाही रडू आवरणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “डोळे अश्रुनी भरून आले” तर एका युजरने लिहिलेय, “प्रत्येक मुलामुलींना तुमचे व्याख्यान ऐकवले पाहिजे. ही या काळाची गरज आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “ज्यांना बाप कळला, त्यांना आयु्ष्य कळले”

हेही वाचा : चिमुकल्याने भर रस्त्यावर चक्क पोलिसांना डान्स करून दाखवला, VIDEO होतोय व्हायरल

vasant_hankare555 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हाच तो बाप पोरी जो तुझ्यासाठी झिजला उपाशी राहिला ..या बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का तू” हे अकाउंट समाज प्रबोधनकार वसंत हंकारे यांचे आहे. ते त्यांच्या अकाउंटवरुन असे अनेक व्हिडीओ शेअर करत असतात.