Shocking Incident During Train Travel : लोकल किंवा रेल्वे प्रवासादरम्यान दररोज अनेक थक्क करणाऱ्या आणि कधी कधी धक्कादायक घटनाही समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी धावत्या ट्रेनच्या दरवाज्यात उभे राहून जीव धोक्यात घालून स्टंट करणाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात. तर काही ठिकाणी प्रवाशांनी ट्रेनच्या छतावर बसून प्रवास केल्याच्या घटनांही समोर आल्या आहे. आता अशाच एका विचित्र आणि धोकादायक घटनेची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
खिडकीतून बाहेर लटकत होता भलामोठा कपाट (Huge Metal Cupborod Seen Hanging Outside Train Window)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये काही प्रवासी एक मोठे लोखंडी कपाट रेल्वेमधून घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे कपाट इतका मोठे होते की तो पूर्णपणे डब्यात मावत नव्हते. शेवटी धावत्या ट्रेनच्या डब्याच्या खिडकीतून एक भलामोठे लोखंडी कपाट बाहेर लटकवून घेऊन जात असल्याचे दिसते. दोरखंडाच्या साहायाने हे कपाट खिडकीला बांधले असून दोन प्रवासी डब्याच्या आतून हा कपाट पकडून ठेवताना दिसत आहेत. दरम्यान, प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. व्हिडीओ रेकॉर्ड करताना तो “ये बिहार है” असे म्हणताना ऐकू येतो.
सोशल मीडियावर व्हिडीओची जोरदार चर्चा (Video Sparks Massive Online Debate)
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला. एका युजरने रेल्वे प्रशासनाला टॅग करत विचारले की, “अशा प्रकारांकडे रेल्वेचे लक्ष आहे की नाही? हा तर संभाव्य रेल्वे अपघाताला आमंत्रण देणारा प्रकार आहे.”
तर दुसऱ्या एका युजरने रेल्वेच्या पार्सल सुविधेचा उल्लेख करत म्हटले की, “मोठ्या वस्तू वाहून नेण्यासाठी रेल्वेकडे स्वतंत्र पार्सल सेवा उपलब्ध आहे. तरीही लोक नियमांचे उल्लंघन करून अशा धोकादायक पद्धतीने सामान का नेतात?”
काही नेटकऱ्यांनी संबंधित गार्ड, स्टेशन मास्टर, टीटीई आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
हा प्रकार किती धोकादायक? (Why Is This Incident So Dangerous?)
ट्रेनच्या बाहेर लटकणारी कोणतीही वस्तू मोठ्या अपघाताचे कारण ठरू शकते. धावत्या ट्रेनच्या मार्गात सिग्नल पोल, वीज खांब, प्लॅटफॉर्मवरील संरचना किंवा इतर अडथळे आल्यास हा कपाट त्यावर आदळू शकतो. त्यामुळे केवळ संबंधित प्रवाशांचाच नव्हे तर इतर प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. याशिवाय कपाट हातातून सुटल्यास तो रुळांवर किंवा प्लॅटफॉर्मवर कोसळून गंभीर दुर्घटना घडू शकते.
रेल्वे प्रशासनाने दिली प्रतिक्रिया (Railways Responds To Viral Video)
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे सेवा (Railway Seva) यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी संबंधित स्टेशनचे नाव, ट्रेन क्रमांक आणि इतर माहिती देण्याचे आवाहन केले. तसेच प्रवाशांना RailMadad पोर्टलवर तक्रार नोंदविण्याचा किंवा 139 हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचा सल्लाही दिला.
दरम्यान, बिहारमधील अभिषेक कुमार नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये दोन महिला असाच एक मोठा लोखंडी कपाट ट्रेनमध्ये चढवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र अनेक प्रयत्न करूनही त्यांना कपाट आत घेता आला नाही.

नियमांचे पालनच सुरक्षित प्रवासाची गुरुकिल्ली (Following Rules Ensures Safe Travel)
सोशल मीडियावर व्हायरल होणारे असे व्हिडीओ काही क्षणांसाठी मनोरंजनाचे कारण ठरत असले तरी त्यामागील धोका दुर्लक्षित करून चालणार नाही. रेल्वे प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे जितके आवश्यक आहे, तितकेच प्रवाशांनीही सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मोठ्या वस्तू वाहून नेताना पार्सल सेवांचा वापर केल्यास अशा घटना टाळता येतील आणि हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.
