Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना डान्स करण्याची आवड असते. अनेक जण आवडीने डान्सचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. लहान मुलांचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर खूप कमी वेळात चांगले लोकप्रिय होतात. नेटकऱ्यांना सुद्धा लहान मुलांचे व्हिडीओ खूप आवडतात. हल्ली प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय दिसतो अशात वयोवृद्ध लोक सुद्धा सोशल मीडियावर दिसतात. त्यांचे मुले किंवा नातवंड त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजीबाई मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. आजीबाईचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (an old lady dance on 90s famous song)

90’s च्या गाण्यावर आजीने केला भन्नाट डान्स

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आजीबाई दिसेल. या व्हिडीओमध्ये आजीने डोक्यावर पदर घेतला आहे आणि नव्वदच्या दशकातील लोकप्रिय गीत “लम्बा लम्बा घूँघट काहे को डाला – गप चुप गुप चुप” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आजीचा डान्स लहान लहान नातवंडे आणि घरातील महिला आवडीने बघतआहे. आजीच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. उतार वयात सुद्धा आजीची ऊर्जा पाहून तुम्हाला तिचे कौतुक वाटेल. व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल, वय हा फक्त एक आकडा असतो, वयाला कशाचेही बंधन नसते.

हेही वाचा : “ती अडल्ट आहे, तिला असं पकडताना तुला..”, द ग्रेट खलीने ‘ज्योती’बरोबर केलेला Video पाहून लोक भडकले; चुकलं तरी काय?

पाहा व्हायरल व्हिडीओ

90s_song._ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आज्जी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वाह, वयाचा आनंद घ्यायला पाहिजे. आयुष्य खूप लहान आहे आणि सुंदर आहे” तर एका युजरने लिहिलेय, “आजी तिच्या काळातली मधुबाला होती” आणखी एका युजरने लिहिलेय, “गोष्ट वयाची नाही तर टॅलेंटची आहे. खूप छान. आजीला सलाम आहे” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला. काही युजर्सनी आजीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.