Viral Video : पती पत्नीचे प्रेम हे जगावेगळे असते. या नात्यात काळजी, जिव्हाळा, विश्वास आणि आपुलकी असते. लग्नानंतर दोन व्यक्ती एकत्र येतात आणि आयुष्यभर बरोबर राहण्याचे आणि प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगी एकमेकांना खंबीर साथ देण्याचे वचन देतात. लग्नानंतर हळू हळू संसाराचा व्याप वाढतो आणि या सर्वांमध्ये नवरा बायको एकमेकांना वेळ देऊ शकत नाही आणि एकमेकांजवळ प्रेम व्यक्त करू शकत नाही पण छोट्या छोट्या गोष्टींमधून ते त्यांचे प्रेम, काळजी नकळत व्यक्त करतात. आता बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या पण जुनी पिढी मात्र आजही अशीच आहे. सध्या एका असाच वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजी आजोबा एकमेकांना प्रपोज करताना दिसत आहे. आजी आजोबांचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला स्टेजवर एक वृद्ध जोडपे दिसेल. स्टेजवर एक अँकर आहे जो दोघांना वय विचारतो. तेव्हा आजी तिचे वय सांगते, “७५” आणि आजोबा त्यांचे वय सांगतात, “७८” त्यानंतर अँकर म्हणतो, “आजी आजोबांना येथे प्रपोज करते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.” त्यानंतर आजी गुडघ्यावर बसते आजोबाला गुलाबाचे फुल देते आणि अँकरच्या सांगण्यावरून आजी म्हणते, “शामराव डार्लिंग आय लव्ह यू..” त्यानंतर आजोबा आजीकडे बोट दाखवून म्हणतात, “बैनाबाई डार्लिंग आय लव्ह यू” या वृद्ध जोडप्याला प्रपोज करताना पाहून जमलेले लोक जोरजोराने हसताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून तु्म्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओवर लिहिलेय, “आजीचं आजोबाला भन्नाट प्रपोज”

हेही वाचा : “वडिलांच्या डोळ्यातील अश्रू सांगतात संघर्ष किती मोठा होता” लेक पोलीस झाल्यानंतर अश्रू अनावर; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)

actor_om_yadav_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रेमाला वय नसतं..”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने अँकरला उद्देशून लिहिलेय, “त्यांच्या म्हातारपणात तू या क्षणाद्वारे तू त्यांचं औषध बनलास मित्रा, छान वाटलं पाहून.. त्यांना खूप खूप आयुष्य लाभो.” तर एका युजरने लिहिलेय, “ही शेवटची पिढी आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “दुखाःच कारण तर कोणी पण बनतं पण एखाद्याच्या आनंदाचं कारण होणे, याला पण नशीब लागतं”