Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण सोशल मीडियावर रिल्स, व्हिडीओ किंवा त्यांच्या आवडीच्या गोष्टी शेअर करताना दिसतात. हल्ली चिमुकल्यांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण गाणी, डान्स तसेच कॉमेडी करत रील बनवताना दिसतात. सध्या असाच एका आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजोबांनी त्यांच्या पत्नीबरोबर सुंदर रील बनवला आहे.

नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निवडणुक म्हटलं तर पक्षा-पक्षामध्ये युती दिसून येते. यावरूनच सोशल मीडियावर एक युतीवर भाष्य करणारी मजेशीर रील व्हायरल होत आहे. या रीलवर अनेक जण व्हिडीओ बनवताना दिसत आहे. आजोबांनी या रीलवर पत्नीसह व्हिडीओ बनवला आहे.
व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आजोबा आणि आजी एका घरात एका ठिकाणी उभे आहेत. आजीच्या हातात प्लेट आहे आणि त्यावर प्लास्टिक आहे. या प्लास्टिकमध्ये डाळ आहे. आजी ही डाळ बघत असते तेव्हा आजोबा सांगतात, “चाळीस वर्षे झाली आमची युती आहे. जमत तर अजिबात नाही पण मोडत बिलकुल नाही” त्यानंतर आजोबा जोरजोराने हसायला सुरूवात करतात. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. काही लोकांना त्यांचे जोडीदार आठवतील.

Samdhi Samdhan Fell in Love
व्याही आणि विहीणबाई पडले प्रेमात, मुलांच्या लग्नाआधीच घरातून झाले पसार
Sonia Gandhi With cigarette Viral Photo
सोनिया गांधी यांच्या हातात सिगारेट पाहून नेटकऱ्यांनी तुफान शेअर केला तो फोटो! पण ‘या’ लहानश्या गोष्टीमुळे सिद्ध झालं खरं
captain anshuman singh smriti singh viral video
शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांना मरणोत्तर किर्ती चक्र; वीरपत्नीनं सांगितला अखेरचा संवाद, म्हणाल्या, “आम्ही पुढच्या आयुष्याचे…”
Joe Biden Donald Trump United States presidential election democratic contenders replace biden
बोलताना अडखळतात, चालताना धडपडतात! बायडन यांची उमेदवारी गेली तर या सहांपैकी कुणालाही मिळू शकते संधी!
My friend Half a century of friendship
माझी मैत्रीण : मैत्रीचं अर्धशतक!
MS Dhoni New Haircut Photos Viral
माहीच्या नव्या ‘हेअर स्टाइल’ने वेधले सर्वांचे लक्ष; व्हायरल फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘काही दिवसात तो ४३ वर्षांचा होईल यावर…’
Sanskrit Oath Bansuri Swaraj
“जशी आई, तशी लेक”, बांसुरी स्वराज यांनी संस्कृतमधून शपथ घेताच नेटिझन्सकडून सुषमा स्वराज यांचा जुना व्हिडीओ व्हायरल
Sambhaji Nagar Accident
“रील बनवताना मृत्यू नाही, माझ्या बहिणीची सुनियोजित हत्या”, बहिणीचा गंभीर दावा; म्हणाली, “३०-४० किमी लांब येऊन…”

हेही वाचा : ‘आई-बाबांना …!’ मुंबईत भाड्याने घर घेणाऱ्या तरुणीची पोस्ट; घराची किंमत सांगत दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : चिलीम-तंबाखू,शिरा-पुरी की खांब-खांब, तुम्ही या खेळाला काय म्हणायचा? Viral Video पाहून बालपणीच्या आठवणी होतील जाग्या

kharotevijay या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चाळीस वर्षे झाली आमची युती आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बाबा तुमच्या अशा स्वभावामुळे, युती कधीच तुटणार नाही ” तर एका युजरने लिहिलेय, “आमच्याही लग्नाला 39 वर्षे झाली आणि तुमच्या सारखंच आहे आमचं पटत नाही पण तुटतही नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “युती कशी तुटणार बाबा गृह खातच तुम्ही काकुकडे दिलं” एक युजर लिहितो, “बाबा तुमची युती जीवन भर अशीच राहो” हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी त्यांच्या लग्नाला किती वर्षे झाली, हे सांगितले आहे.