Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक काका चक्क बसस्टॉपवर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (an uncle dance so gracefully in sambhaji nagar bus stop video goes viral on social media)

संभाजीनगरच्या बसस्टॉपवर काकांनी केला बिनधास्त डान्स (an uncle dance so gracefully in sambhaji nagar bus stop )

असं म्हणतात, आवड जोपासायला वयाचे बंधन नसते. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला असेच एक काका दिसेल ज्यांना डान्स करण्याची आवड आहे आणि ते चक्क बस स्टॉपवर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ संभाजीनगर बसस्टॉपवरील आहे.”मैं तो रस्ते से जा रहा था” गाण्यावर हे काका डान्स करत आहे. काकांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हालाही डान्स करावासा वाटेल. या व्हिडीओवर लिहिलेय, “टेन्शन विसरायला शिका”

हेही वाचा : हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम

u

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप

madhavlipane या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नवीन ट्रेंड आहे..प्रत्येक बस स्टॅण्ड वर एक काका नाचताना दिसणार” तर एका युजरने लिहिलेय, “रिटारमेंट नंतर पेन्शन चालू झाल्यावर” आणखी एका युजरने लिहिलेय, “काकाची पेन्शन आली वाटते टेन्शन फ्री” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक डान्स व्हिडीओ समोर आले आहेत.

काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या आजोबांनी मित्रांबरोबर डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्या आजोबांचे नाव आजोबांचे नाव विजय खरोटे आहेत आणि ते एक लोकप्रिय व्हिडीओ क्रिएटर आहेत

Story img Loader