scorecardresearch

रस्त्यावर सुसाट पळणारी कार, छतावर बसलाय कुत्रा, अन् त्या नंतर जे घडलं ते पाहून भडकले नेटकरी

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून कळेल, नेटकरी का भडकले…

Dog Spotted Travelling
व्हिडीओत कुत्रा कारच्या टपावर बसल्याचे दिसत आहे. (Photo-Forever Bengaluru)

Viral Video: सोशल मीडियावर आपल्यासमोर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आपल्यासमोर असे काही व्हिडीओ येत असतात, जे पाहून आपले मनोरंजन होतं, तर काही व्हिडीओ हे आपल्याला आश्चर्यचकीत करणारे असतात. लोक रस्त्यावरील इतरांचे फोटो आणि व्हिडीओ देखील घेतात जे कोणत्याही नियमाचे उल्लंघन करताना दिसतात, जेणेकरून अधिकारी त्यांच्यावर कारवाई करू शकतील. इथे अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे चालत्या गाडीच्या छतावर कुत्रा बसल्याचा व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेला आलाय. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून जे पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

फॉरएव्हर बेंगळुरूने आपल्या ट्विटर पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या पेजवरील व्हिडीओ काही दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता, मात्र, ही घटना नेमकी कधी घडली हे स्पष्ट झालेले नाही. पेजने जुना व्हिडीओ शेअर केला असण्याची शक्यता आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असला तरी इंटरनेट युजर्स यावर प्रचंड नाराज आहेत.

(हे ही वाचा : Video: भररस्त्यात कारच्या छतावर चढून तरुणीची स्टंटबाजी, त्यानंतर असं काही घडलं…पाहा व्हायरल व्हिडीओ )

Ford Ikon sedan कारच्या छतावर दिसतोय कुत्रा

या व्हिडीओमध्ये Ford Ikon sedan कार रस्त्यावरून जात असल्याचे दिसत आहे आणि ही कार सुसाट वेगाने जात आहे. या कारच्या छतावर एक कुत्रा आहे. हा कुत्रा उभा दिसतो आहे. या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे. त्यामुळे हा कुत्रा पाळिव कुत्राच असावा असं म्हटलं जात आहे. दुसऱ्या कारमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. व्हिडिओमध्ये हा कुत्रा मध्येच उभा तर मध्येच बसताना दिसतोय.

येथे पाहा व्हिडीओ

कारच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी

७१ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ आधीच पाहिला आहे आणि त्यापैकी बरेच जण त्यावर भडकलेले दिसत आहेत. कुत्र्यांचा जीव धोक्यात घालत असल्यामुळे लोकांनी कारच्या मालकाला चांगलेच फटकारले आहे. व्हिडीओ शेअर होताच लोकांनी कारच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कुत्रा चालत्या गाडीच्या वर का बसला, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 11:16 IST
ताज्या बातम्या