IND vs AUS Anand Mahindra Tweet: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात १८९ धावांचे लक्ष्य पूर्ण करत टीम इंडियाने दणदणीत विजयाची नोंद केली. भारताचा विजय झाला तरीही सुरुवातीच्या काही विकेट्स मात्र ज्या वेगाने गेल्या त्यावरून सामना बघायला पोहोचलेल्या आनंद महिंद्रा यांच्यासह अनेकांची धडधड वाढली होती. भारतीयांचे क्रिकेट प्रेम इतके आहे की सामन्याच्या वेळी श्रद्धा – अंधश्रद्धा सगळे वाद बाजूला ठेवून अनेकजण लक फॅक्टरचा विचार करतात. विकेट पडू नये म्हणून अमुकच पोजिशन मध्ये बसून राहायचं, हलायचं नाही हे अलिखित नियम तुम्हीही ऐकून असाल. याच विचारातून कालच्या IND vs AUS सामन्यात एका महिलेने चक्क आनंद महिंद्रा यांना स्टेडियममधून निघून जाण्यास सांगितले. नेमका काय प्रकार घडला हे महिंद्रा यांनी ट्वीटमध्ये सांगितले आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना बघण्यासाठी बिझनेस टायकून आनंद महिंद्रा हे सुद्धा आले होते. भारताची सुरुवातीची खेळी पाहता महिंद्रा यांनी ट्वीट करत लिहिले की, “एक अत्यंत जबरदस्त विजय पाहण्यासाठी मी आज मॅचला आलो होतो पण मी जेव्हापासून आलो तेव्हापासून फक्त विकेट्स पडत आहेत. म्हणूनच मी आता माझ्यामुळे विकेट गेल्या असे म्हणण्याच्या आधी इथून निघण्याचा विचार करतोय” यावर एका महिलेने महिंद्रांना “हो सर तुम्ही निघून जा” असे म्हणत रिट्विट केले.

IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
Surya is Back: अशक्य वाटणारा फटका ‘मसल मेमरी’मुळे खेळतो! सूर्यकुमार यादवनं सांगितलं यशाचं कारण
IPL 2024 Chennai Rajasthan Royals vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: “असा विचार करू नका…” हर्षा भोगलेंना विजयानंतर शुबमन गिल नेमकं काय म्हणाला, पाहा व्हीडिओ
CJI DY Chandrachud
“एवढ्याश्या कारणावरून मला ट्रोल केलं जातं…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितली व्यथा
Do not want to think what doctor said Shreyas Iyer
Shreyas Iyer : केंद्रीय करार आणि दुखापतीवर श्रेयसने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘जर तुम्ही भूतकाळ किंवा भविष्यावर…’

आनंद महिंद्रा ट्वीट

दरम्यान, महिलेच्या या ट्वीटवर उत्तर देताना महिंद्रा म्हणतात की, “हो मी खरंच निघून गेलो होतो. आशा आहे की आतातरी आपला खेळ सावरला असेल.” दुसरीकडे सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अजय देवगण हे वानखेडे मैदानात उपस्थित होते. अनेकांनी भारताच्या विजयाचे श्रेय रजनीकांत यांच्या उपस्थितीला सुद्धा दिले आहे.