खेळ असो किंवा एखादा प्रोजेक्ट कोणतेही काम करताना टीममधील प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्त्वाचे असते. अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी टीममधील सर्वांनीच उत्तम कामगिरी करणे गरजेचे असते. जर एकही जण यात कमी पडला तर त्याचा परिणाम संपूर्ण टीमच्या कामगिरीवर होतो. त्यामुळे कोणतेही काम सुरू करण्यापुर्वी त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते, कोणत्या सदस्यावर कोणती जबाबदारी आहे याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते. असे झाले नाही तर कितीही प्रयत्न केले तरी यश मिळवता येणार नाही. याचाच प्रत्येय सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमधून येत आहे. या व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ :

nashik bjp marathi news, pravin darekar marathi news
“मोदी द्वेष हेच महाविकास आघाडीचे सूत्र”, प्रवीण दरेकर यांची टीका
Semiconductor project
सेमीकंडक्टर चिपच्या १.२६ लाख कोटींच्या ३ प्रकल्पांना मोदी सरकारची मंजुरी; ३ पैकी २ प्रकल्प गुजरातमध्ये
shubhangi galande bold decision of pregnancy happy single mother
मला आई व्हायचंय… म्हणणाऱ्या शुभांगी गलांडेच्या ‘या’ धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक; पाहा…
patanjali ayurved marathi news, patanjali ayurved supreme court notice marathi news, baba ramdev supreme court notice marathi news
सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पतंजली आयुर्वेदला नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण…

आणखी वाचा : पुरणपोळीचे जेवण, टोपी घालून मानपान; मोलकरणीने दिलेली Farewell Party पाहून तुम्हीही व्हाल भावूक

या व्हिडीओमध्ये दोन पक्षी आणि एक खड्डा दिसत आहे. यातील एक पक्षी पायाने खड्डयात माती टाकून खड्डा भरण्याचा प्रयत्न करत आहे, तर एक पक्षी खड्ड्यातील माती पायाने बाहेर टाकत असल्याचे दिसत आहे. हे पक्षी एकमेकांच्या विरुद्ध काम करत असल्याने, दोघांनाही यात कधीच यश मिळणार नाही. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये आनंद महिंद्रा यांनी याबाबत लिहले आहे, ‘कधीकधी प्रोजेक्ट टीममध्ये काम करताना असा अनुभव येतो, टीममधील प्रत्येकजण एकाच उद्दिष्टासाठी काम करत आहे याची खात्री बाळगणे आवश्यक आहे’. कोणतेही काम करण्यापुर्वी त्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे, असा संदेश या व्हिडीओमधून देण्यात येत आहे.