आनंद महिंद्रांनी दिलेला शब्द पाळला; नीरजला गिफ्ट केली ‘ती’ खास कार, पाहा फोटो

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राला दिलेलं वचन आनंद महिंद्रांनी पूर्ण केलंय.

tokyo olympic gold medalist neeraj chopra to get xuv700 as a gift from anand mahindra
आनंद महिंद्रा आणि नीरज चोप्रा

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राला दिलेलं वचन आनंद महिंद्रांनी पूर्ण केलंय. खुद्द गोल्डन बॉय नीरजने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला आनंद महिंद्रा यांनी एक एसयूव्ही भेट दिली आहे. नीरज चोप्राने या SUV साठी ट्विट करून आनंद महिंद्राचे आभार मानले. यावर आनंद महिंद्रा यांनी नीरज चोप्रा उत्तर देत म्हटलं की, “तुम्ही देशाला अभिमान वाटेल, असं काम केलंय.”

नीरजने ट्विट करत धन्यवाद आनंद महिंद्राजी, मी लवकरच या अतिशय खास कारला फिरण्यासाठी बाहेर काढण्यास उत्सुक आहे, असं म्हटलं होतं. यावर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटलं की, “तु देशाची अभिमान वाटेल असं काम केलंय. आशा आहे की आमच्या चॅम्पियन्सचा रथ असलेल्या SUV चा तुम्हाला अभिमान वाटेल.”

दरम्यान, नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उंचावले होते. टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्ण कामगिरीसाठी भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रांनी एक्सयूव्ही ७०० ही गाडी देणार असल्याची घोषणा केली होती.  

यापूर्वी आनंद महिंद्रा यांनी रिओ ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिक आणि पी. व्ही. सिंधू यांना महिंद्रा थार भेट दिली होती. याशिवाय भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर आनंद महिंद्रा यांनी मोहम्मद सिराज, टी. नटराजन, शुबमन गिल, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांनाही उत्तम कामगिरीसाठी थार गाडी भेट दिली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anand mahindra gifted suv 700 to golden boy neeraj chopra hrc