उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. चांगल्या वाईट गोष्टींची त्यांना परख आहे. वेळोवेळी ते पोस्टच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. चांगल्या कामाचं ते नेहमी कौतुक करतात आणि मदत किंवा बक्षीसही देतात. आतापर्यंत आनंद महिंद्रा यांनी अनेकांना मदत तसेच वडिलकीचा सल्ला दिला आहे. तसेच भारताचं नाव उंच करण्याऱ्या खेळाडूंचा गौरवही केला आहे. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेवेळी त्यांनी खेळाडूंना गाडी देण्याचा शब्द दिला होता. आता टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवणाऱ्या अवनी लेखराला XUV700 दिली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी शब्द दिला होता. खासकरून या गाडीची पुढच्या दोन सीट्स कस्टम केल्या आहेत. दिव्यांग व्यक्तींना यात आरामात चढता-उतरता आणि बसता येणार आहे. तसेच पुढची सीट पाठीपुढे होते आणि बाहेर निघते. त्यामुळे आरामात बसता येतं. गाडीत बसल्यांतर रिमोटच्या सहाय्याने सीट आत घेता येते. दिव्यांग व्यक्तींना मोठ्या गाड्यांमध्ये बसताना समस्या येते. ही बाब लक्षात घेऊन सीटवर सरळ व्हिलचेअर घेऊन बसता येतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखरा हिनं दोन पदकं जिंकत तिने इतिहास रचला आहे. याआधी नीरज चोप्रा आणि सुमित अंतिल यांनाही महिंद्रा XUV700 ची गोल्ड एडिशन देण्यात आली आहे. तिन्ही कार महिंद्राच्या डिझाइन ऑफिसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य डिझाइन अधिकारी प्रताप बोस यांनी डिझाइन केल्या आहेत. अवनीला मिळालेली एसयूव्ही मिडनाईट ब्लॅक शेडमध्ये आली आहे. आत आणि बाहेर खास गोल्ड अॅक्सेंट देण्यात आले आहेत. याशिवाय अवनीचा परफॉर्मन्स रेकॉर्डही इथे पाहायला मिळाला आहे. ही विक्रमी आकृती एसयूव्हीच्या फेंडर्स आणि टेलगेटवर सुवर्ण अक्षरात लिहिली आहे. गाडी मिळाल्यानंतर अवनीने सोशल मीडियावरून आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहेत. गाडी खास वैशिष्टांसह दिल्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महिंद्रा XUV700 ही कंपनीची सर्वात महागडी एसयूव्ही आहे. भारतात गाडीची एक्स-शोरूम किंमत १२.९५ लाख रुपयांपासून सुरू होते आणि २३.७९ लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीने या एसयूव्हीला मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये दिली आहेत. कंपनीने दोन इंजिन पर्याय दिले आहेत ज्यात २.०-लीटर जीडीआय टर्बो पेट्रोल आणि २.२ लीटर mHawk डिझेल इंजिन समाविष्ट आहे. कंपनीने या दोन्ही इंजिनसह ६-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशन दिले आहे.

“मी माझा Pull Shot कसा सुधारू?”, चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नाला रोहितनं दिलं ‘असं’ उत्तर!

अवनी लेखरा ११ वर्षांची असताना, तिचा अपघातात झाला होता. या अपघातात तिला पाठीच्या मणक्याला दुखापत झाली, ज्यामुळे तिला अर्धांगवायू झाली. जयपूर, राजस्थानची येथे राहणारी, अवनीची महिलांच्या १० मीटर एअर स्टँडिंग शूटिंगच्या एसएच१ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ५व्या स्थानावर आहे. अवनीला तिच्या वडिलांनी पॅरा स्पोर्ट्समध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केले होते. अवनीने नेमबाजी आणि तिरंदाजी या दोन्हीमध्ये खेळांमध्ये रस दाखवला होता. पण शेवटी तिने नेमबाजीमध्ये कारकीर्द घडवण्याचे ठरवले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra give xuv700 to paralympic gold medalist avani lekhara rmt
First published on: 20-01-2022 at 10:41 IST