Viral video: गेल्या दोन दशकांमध्ये भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणावर शहरांच्या पुनर्निर्मिती धोरणांवर जोर देण्यात आला आहे. मात्र भारतात वाढत्या गृहनिर्माण संकटामुळे आर्किटेक्चर आणि इमारत बांधकाम उद्योगातील नवनवीन कल्पानांच्या बाबतीत बरेचदा मागे पडला आहे. क्रिएटिव्ह काम होण्याएवजी वर्षानुवर्ष बांधलेल्या इमारतींचं डिझाइन आजही तसंच फॉलो केलं जातं. दरम्यान याच संबंधित एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे. एका इमारतीत खिडकीचे रूपांतर काही सेकंदात बाल्कनीत कसे केलं आहे हे दाखवणारा हा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.
महिंद्रा यांनी लिहिले, “खरं सांगायचं तर, बांधकाम उद्योग क्वचितच नवनिर्मितीसाठी उपयुक्त ठरतात, त्यामुळे हे खूप प्रभावी आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या खिडकीच्या डिझाइन खूप भविष्यात उपयुक्त ठरु शकतात कारण यामध्ये एकाच जागेत तुम्ही दोन्ही गोष्टींचा आनंद घेऊ शकता. परंतु यासारख्या खिडकीच्या डिझाइन अनेक आर्किटेक्चर कंपन्यांनी आधीच इमारतींमध्ये बसवल्या आहेत.
व्हिडीओ पाहून यूजर्स म्हणाले….
एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, “मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांसाठी ही एक चांगली कल्पना आहे कारण आजकाल बहुतेक खोल्या बाल्कनी मुक्त आहेत.” दुसर्या व्यक्तीने लिहिले, “थंड हवामानासाठी अशा स्टीलच्या रचना योग्य असू शकतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: “हा पाकिस्तान नाही भारत आहे” सीमा हैदरचा बंद खोलीतील व्हिडीओ व्हायरल; नेटकरी संतापले
बाल्कनीचे डिझाईन जरी प्रभावी दिसत असले तरी ते त्याच्या वापराबाबत संभ्रम होतो याकडेही अनेकांनी लक्ष वेधले. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, “ते छान आहे आणि सर्व काही आहे, परंतु मी काचेच्या जमिनीवर उभं राहण्याचं धाडस करु शकत नाही.