scorecardresearch

डोक्यावर सामान ठेवून बॅलेंन्स करत सायकल चालवणाऱ्या तरुणाचं आनंद महिंद्रांनी केलं कौतुक; म्हणाले…

ट्विटर वापरकर्त्यांनी तरुण सायकलस्वाराच्या प्रयत्नांचे कौतुक केले. व्हिडीओ जवळपास ४ लाख लोकांनी पाहिला आहे.

mahindra shared video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @anandmahindra / Twitter)

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एका तरुणाच्या व्हिडीओला पोस्ट करत पसंती दर्शवली आहे. त्या व्हिडीओमध्ये सायकल चालवताना एक तरुण सायकल न पकडता डोक्यावरती ठेवलेलं कपड्यांचं बंडल पकडलेलं दिसत आहे. व्हिडीओ मूळतः प्रफुल्ल एमबीए चाय वाला यांनी पोस्ट केला होता, जो स्वतःला ट्विटरवर देवदूत गुंतवणूकदार म्हणून वर्णन करतो.

व्हिडीओ पोस्ट करताना महिंद्रा यांनी लिहले की, “हा माणूस एक मानवी सेग्वे (दोन चाकांसह स्वयं-संतुलित वैयक्तिक वाहतूक यंत्र) , त्याच्या शरीरात एक बिल्ट इन जायरोस्कोप आहे! संतुलनाची अविश्वसनीय भावना. तथापि, मला कशाचा त्रास होतो, ते म्हणजे आपल्या देशात त्याच्यासारखे बरेच लोक आहेत जे प्रतिभावान जिम्नॅस्ट/खेळाडू असू शकतात परंतु त्यांना शोधलं जात नाही किंवा त्यांना प्रशिक्षितही केलं जात नाही…”

(हे ही वाचा: गोरिलावर चढला ‘पुष्पा’ फिवर! ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या हुकस्टेप करतानाचा Video Viral)

हा तरुण गावाजवळील अरुंद रस्त्यावरून सायकलवरून जात असताना आणि हात न वापरता सहजतेने वळणावर नेव्हिगेट करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याचे सर्व लक्ष कपड्यांचे बंडल धरण्यावर आहे. तरुणाच्या मागून येणाऱ्या वाहनातून हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. सायकलवरचा माणूस रस्ता सोडून गावाकडे वळतो तेव्हा व्हिडीओ अचानक संपतो.

(हे ही वाचा: “तुमच्यापैकी कोणी रडत का नाही?…” लग्नानंतर सासरी जाताना वधूने कुटुंबीयांना विचारला प्रश्न; मजेशीर उत्तराचा Viral Video)

(हे ही वाचा: Viral Video: एकापाठोपाठ एक अनेक हरणांनी मिळून केला बारवर हल्ला; कारण…)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

ट्विटर वापरकर्त्यांनी तरुण सायकलस्वाराच्या प्रयत्नांचे कौतुक केले, त्यांच्यापैकी काहींनी असे म्हटले आहे की ते त्यांना हा व्हिडीओ बघून त्यांचे बालपण आठवते. एका वापरकर्त्याने ट्विट केले की, “आम्हाला खेडेगावात लपवलेले रत्न शोधायचे आहे.” ट्विटरवर पोस्ट केल्यापासून हा व्हिडीओ जवळपास ४ लाख लोकांनी पाहिला आहे. मूळतः व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या प्रफुल्लने धन्यवादची इमोजी पोस्ट करून कृतज्ञता व्यक्त केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anand mahindra praised the young man who was riding a bicycle with balance on his head ttg