Viral video: उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करीत ते नेहमीच सर्वांना प्रेरित करीत असतात. दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी आता आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. तसेच घरात मुलगी असणाऱ्या प्रत्येकानं पाहावा असा हा व्हिडीओ आहे. भारतीय परंपरेत पुरुषप्रधान संस्कृती आहे. आजही आपल्या कुटुंबाला वंशाचा दिवा हवा म्हणून अनेकांचा आटापिटा सुरू असतो. याला कारण म्हणजे ‘मुलगी नको गं बाई…!’ असं सहजपणे म्हटलं जातं. मात्र, अशा लोकांना या व्हिडीओनं चांगलंच सणसणीत उत्तर दिलं आहे.

आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला आहे, जो मुलींना समर्पित आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शन लिहिली आहे की, देवाने आम्हाला दोन मुली दिल्या, ज्यांनी आमचे जग उजळवले आहे. (पीयूष पांडे आणि त्यांच्या टीमचे त्यांच्या अद्भुत आणि हृदयस्पर्शी कार्याबद्दल अभिनंदन). लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला असून, तो लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे.

या व्हिडीओमध्ये एक महिला गर्भवती असून, तिच्या डोहाळजेवणाचा हा व्हि़डीओ आहे. यावेळी तिला सर्व महिला मुलगाच होईल, मुलगाच हवा, असं म्हणत आहेत. त्यावर ती मात्र तिच्या होणाऱ्या बाळाला सांगते की, येशील तर मुलगी बनूनच ये. लोकांचं ऐकू नकोस.. “तू आलीस तर मुलगी बनून ये…, पुढे ती महिला बोलते, “खूप नशिबवान असतात ते लोक ज्यांना मुलगी असते, तुझ्या येण्यातच माझं पु्न्हा येणं आहे. “तू आलीस तर मुलगी बनून ये.” मुलगी नको, हा नारा आजही अनेक ठिकाणी दिसतो. काही ठिकाणी तो थेट असतोच तर काही ठिकाणी छुपा. लगतच्या काळात अशा काही घटना समोर आल्या आणि आपण कितीही शिकलो, प्रगत झालो, तरी मुलगा-मुलगी हा भेद मनात आहेच, हे सिद्ध झालेय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; महिलांच्या भांडणामध्ये आलेल्या तरुणानं खाल्ला मार; VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही चांगलाच पसंतीस उतरला आहे. तसेच या व्हिडीओवर, “नशीबवान असतात ते; ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते.”, “खूप सुंदर! मुली खऱ्या अर्थाने जीवनात आनंद आणि प्रकाश आणतात.”, “मुली घरच्या लक्ष्मी असतात”, अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.