Neeraj Chopra Viral Video : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या नीरज चोप्राची सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. कारण इंटरनेटवर नेहमीच सक्रीय असणारे महिंद्रा समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी नीरज चोप्राचा एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे. महिंद्रा ट्विटरवर पोस्ट शेअर करून माणसांमध्ये दडलेलं छुपं टॅलेंट जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. अपार मेहनत, काबाडकष्ट करून आणि सतत खेळाच्या मैदानात घाम गाळून यशाचं उंच शिखर गाठता येतं. जगातील सर्वात मोठ्या ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत दिग्गज खेळाडूंच्या मागे अशाच प्रकारची मेहनत दडलेली असते. कारण महिंद्रा यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राचा वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर केला आहे. २०२३ मध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी नीरज इंग्लंडमध्ये ट्रेनिंग घेत आहे. “एखाद्या मोठ्या स्पर्धेत विजय मिळवणं कोणत्याच खेळाडूसाठी सोपं नसंत,” अशी प्रतिक्रिया महिंद्रा यांनी नीरजचा व्हिडीओ पाहिल्यानंतर दिली आहे.

अपार मेहनत, काबाडकष्ट आणि…; आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ एकदा पाहाच

आनंद महिंद्रा यांनी नीरजचा वर्कआऊटचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. या व्हिडीओला कॅप्शन देत ते म्हणाले, “मोठं यश मिळवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. मोठ्या स्पर्धांमध्ये जिंकण्यासाठी पडद्यामागे या खेळाडूंनी अपार मेहनत केलेली असते. सोप्या मार्गाने काहीच मिळत नाही, असं नीरज चोप्राचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच म्हणता येईल.” विश्व चॅम्पियनशिप्स, एशियन गेम्स २०२३ आणि डायमंड लीगचा अंतिम सामन्यासाठी यंदाच्या या तीन मोठ्या स्पर्धांसाठी नीरज चोप्राचा जोरदार सराव सुरु आहे.

mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
rohit sharma gets emotional as he opens up on 2023
Video : वर्ल्डकपची आठवण काढताच रोहित शर्मा झाला भावुक, कपिल शर्माच्या शोमध्ये म्हणाला, “मी आणि विराटने…”
supriya sule interview
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ सामना; सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान मात्र वेगळंच

नक्की वाचा – किंग कोब्रासोबत खेळायला लागला… काही सेकंदातच कोब्राने खेळ खल्लास केला, Video पाहून थरकाप उडेल

इथे पाहा व्हिडीओ

धावपटू मायकल जॉन्सन यांनीही नीरज चोप्राचा व्हिडीओ शेअर केला होता. मायकल यांनीही नीरजचं धावण्याचं आणि जम्पिंगचं कौशल्य पाहून कौतुक केलं होतं. नीरजचा जबरदस्त फिटनेसी मायकल यांनाही भुरळ पडली होती. “ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत चॅम्पियन असणारा नीरज चोप्रा एक जबरदस्त धावपटूही आहे”, असं ट्वीट मायकलने केलं होतं. नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून टोक्यो ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं. पात्रता फेरीतही नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले होते. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिलं सुवर्णपदक आहे.

डायमंड लीग जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने यावर्षी पुन्हा एकदा देशाचा गौरव केला. त्याने डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि असे करणारा तो पहिला भारतीय ठरला. त्याचा सर्वोत्तम थ्रो ८८.४४ मीटर होता. नीरजला यंदा दुखापतींशी झुंज दिली, पण मैदानात उतरल्यावर त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली. या स्पर्धेत नीरजची सुरुवात चांगली झाली नाही, पण नंतर शानदार पुनरागमन करत सुवर्णपदक जिंकले.