scorecardresearch

Premium

Anand Mahindra Tweet: “यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही…” आनंद महिंद्रा यांनी शेअर केला FIFA चा मजेदार प्रमोशनल व्हिडिओ

२०२२ चा FIFA विश्वचषक लवकरच सुरू होणार आहे आणि कतारमध्ये होणार्‍या मेगा स्पर्धेची जगभरात उत्सुकता सुरू आहे. आनंद महिंद्रा यांनी या संदर्भातील आफ्रिकन मुलांचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.

Anand mahindra tweet
फोटो(प्रातिनिधिक)

देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे अनेकदा आपल्या ट्वीटमुळे चर्चेत असतात. ते दररोज असे काही व्हिडिओ आणि ट्वीट शेअर करत असतात जे अनोखे वाटतात. हे व्हिडीओ आपल्याला कधीकधी हसवतात तर काही शेअर केलेले ट्वीट आपल्याला जीवनाचा चांगला धडा शिकवतात. असेच एक ट्वीट सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. जे पाहिल्यानंतर तुमचा दिवस नक्की आनंदात जाईल.

२०२२ चा FIFA विश्वचषक लवकरच सुरू होणार आहे आणि कतारमध्ये होणार्‍या मेगा स्पर्धेची जगभरात उत्सुकता सुरू आहे. हा उत्साह केवळ या फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांपुरता मर्यादित नसतो, तर जगभरातून लोक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येतात. या स्पर्धेसाठी लोकं कोट्यवधी रुपये रुपये केवळ प्रमोशनमध्ये खर्च करतात. पण या महागड्या जाहिराती लोकांमध्ये तितका उत्साह निर्माण करू शकणार नाहीत, जितका आफ्रिकेतील काही मुलांनी विश्वचषकापूर्वी एकत्र केला आहे.

A friend blows out a candle while cutting the cake Got into a big fight with the birthday girl
केक कापताना मैत्रिणीने विझवली मेणबत्ती; बर्थडे गर्लबरोबर झालं जोरदार भांडण…मजेशीर Video व्हायरल
viral video Three men rescued after they drive SUV into fast flowing river
भलतं धाडस पडलं महागात! तरुणांनी थेट नदीत उतरवली कार अन्….; थरारक व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा
game changers for Team India in the World Cup 202
World Cup 2023: रोहित, विराट किंवा गिल नव्हे तर ‘हे’ तीन खेळाडू विश्वचषकात भारतासाठी असतील गेम चेंजर्स, युवराज सिंगने केले भाकीत
a advertisement of ceiling fans company
शंभर पंख्यांचा वापर करून साकारला गणपती बाप्पा, होर्डिंगवरील जाहिरातीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

( हे ही वाचा: दंगल गर्ल गीता फोगटने खरेदी केली महिंद्रा स्कॉर्पिओ-एन कार; आनंद महिंद्रा म्हणाले, “आमच्यासाठी तर हा…”)

आनंद महिंद्रा यांचे ट्विट येथे पाहा

( हे ही वाचा: Video: गावातील माणसाने ट्रकला बनवला चालता फिरता लग्नमंडप हॉल; आनंद महिंद्रा म्हणाले ‘मला भेटायचे आहे…’)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, आफ्रिकेतील काही मुले फिफा वर्ल्ड कपसारखे वातावरण तयार करून मॅच खेळताना दिसत आहेत. यामध्ये FIFA 2022 चा बॅनर दिसतो आहे. जो त्यांनी स्वतः बनवला आहे आणि त्यानंतर दोन्ही संघ मैदानात फुटबॉल घेऊन भांडू लागतात, परंतु काही वेळाने मुले खेळ सोडून नाचू लागतात. त्याचा हा डान्स खूपच अनोखा असतो आणि बघता बघता तो विजयानंतरच्या सेलिब्रेशनचा आनंद घेत असल्याचे दिसते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anand mahindra shares video of african kids fifa world cup gps

First published on: 30-09-2022 at 12:45 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×