Anand Mahindra Tweet: भारतातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा(Anand Mahindra) हे त्यांच्या ट्वीटमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते दररोज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून खूप पोस्ट करताना दिसतात. कधी देशातील गंभीर समस्या आपल्या माध्यमातून मांडतात तर कधी एखादा व्हिडीओ शेअर करत त्याची गोष्ट सांगताना दिसतात. सध्या त्यांनी शेअर केलेलं एक ट्विट चांगलंच चर्चेत आहे. त्यांनी Adidas सारख्या सेम दिसणाऱ्या बुटाबद्दल त्या ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, Adi ला एक भाऊ आहे ज्याचे नाव अजित आहे. वसुधैव कुटुम्बकम?

Adidas सारखा सेम आहे हा शूज

आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्विटमध्ये एका व्यक्तीचा फोटो आहे. मात्र, त्या व्यक्तीचे केवळ बूट आणि पायाचा छोटासा भाग दिसत आहे. शूज पांढऱ्या रंगाचे आहे. ते पहिल्यांदा बघितल्यावर Adidas सारखे वाटतात. पण नीट पाहिल्यानंतर हे शूज Adidas चे नसून Ajitdas या स्थानिक कंपनीचे असल्याचे कळते. आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटवर लोक जोरदार कमेंट करत आहेत.

Rekha intimate scenes with shekhar suman
४० वर्षांपूर्वी शेखर सुमन यांनी रेखाबरोबर केले होते इंटिमेट सीन; आठवण सांगत म्हणाले, “मला त्या दृश्यांचे शूटिंग करताना…”
Kiran Mane Post Viral
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
“तुमच्या जाण्यायेण्याचा खर्च मी करतो, फक्त तुम्ही…”; उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांना खुली ऑफर

( हे ही वाचा: Video: भर लग्नमंडपातच वधू-वर झाले रोमँटिक; लग्नाचे विधी सुरू असतानाच एकमेकांचे चुंबन घेतले अन…)

( हे ही वाचा: रोज चहाच्या स्टॉलला भेट देतो ‘हा’ प्राणी; IFS Officer ने शेअर केलेला Video एकदा पाहाच)

आनंद महिंद्राच्या या ट्विटला ५०० हून अधिक लोकांनी रिट्विट केले

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्या या ट्विटला आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांनी ते रिट्विट केले आहे. तसंच यावर लोकं आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर एका यूजरने लिहिले की, त्याला एक बहीण देखील आहे जिचे नाव अदा आहे. बाजारात अनेकदा ओरिजिनल ब्रँडचे डुप्लिकेट शूज, घड्याळे, कपडे इत्यादी अनेकदा बाजारात पाहायला मिळतात. जेव्हा त्यांचे बारकाईने निरीक्षण केले जाते तेव्हा फरक स्पष्टपणे दिसून येतो.