Ananad Mahindra Viral Tweet: भारतीयांना प्रत्येक गोष्टीला आपला वेगळा टच देण्याची सवय आहे. यातून काही मॅजिकल गोष्टी सुद्धा घडल्या आहेत तर काही प्रयोग मुळापासून फसले आहेत. अलीकडेच अशाच एका प्रयोगाची प्रचिती आनंद महिंद्रा यांना सुद्धा आली. मुंबईची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी पार्कमधील एक खास फोटो शेअर करून भारतीयांच्या सवयींवर भाष्य केलं आहे. आता याच पोस्टवर नेटकऱ्यांनी सुद्धा तुफान प्रतिसाद देत आनंद महिंद्रा यांना आपापले अनुभव सांगितले आहेत. ही मूळ पोस्ट नेमकी काय होती व आता त्यावर नेटकरी कशा प्रकारे प्रतिसाद देत आहेत हे पाहूया.

आनंद महिंद्रा यांनी शिवाजी पार्क परिसरातील एका गाडीचा फोटो पोस्ट केला होता. यावर ज्युरासिक पार्कच्या पोस्टरसारखा एक स्टिकर लावण्यात आला होता. पहिल्या नजरेत हा स्टिकर ज्युरासिक पार्कच्या चित्रपटाचाच आहे असे वाटेल पण नीट पाहिल्यास त्यावर तुम्हाला भलतंच काही लिहिलेलं दिसून येईल. आनंद महिंद्रा यांनी हा फोटो शेअर करत “याला म्हणतात भारतीयकरण…फक्त मुंबईतच नाही पण संपूर्ण देशात असे उदाहरण पाहायला मिळते. भारतीयांची संस्कृती की अस्वलाच्या मिठीइतकी विशाल आहे, ज्यात सगळं काही सामावून घेतलं जाते”

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
regularly eating papaya on an empty stomach
Papaya Benefits : सकाळी उपाशी पोटी खा पपई , ॲसिडिटीचा त्रास होईल दूर; जाणून घ्या, आहारतज्ज्ञ काय सांगतात..
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
viva
सफरनामा: होली खेले मसाने में..

आनंद महिंद्रा ट्वीट (Anand Mahindra Tweet)

दरम्यानच या ट्विटवरून आनंद महिंद्रा यांना अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातील सुशी हॉटेल, पास्ताची गाडी, पाणीपुरीचे स्टॉल यावर चिडून भाष्य करणाऱ्या एका तरुणाची तळमळ महिंद्रा यांना सुद्धा भावली. हा व्हिडीओ त्यांनी शेअर करत हे बेस्ट होते असं म्हंटल आहे.

हे ही वाचा<< ८५ फुट लांबून बास्केटबॉलचा बॅक शॉट मारला; Video पाहून म्हणाल, “याच्या पाठीला डोळे…”

तुम्हाला ही पोस्ट किती पटतेय हे कमेंट करून नक्की कळवा.