आनंद महिंद्रा ट्विटरवर चांगलेच सक्रिय आहेत. ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर नेहमी नवनवीन गोष्टी शेअर करत असतात. बऱ्याचदा त्यांची पोस्ट खूप विचार करायला लावणारी, प्रेरणा देणारी किंवा मजेदार असते. रविवारी त्यांनी असाच एक फोटो शेअर केलाय.  या मीममधून त्यांना भारतीयांना आणि भारतीय पदार्थांना कमी लेखू नका, असंच म्हणायचंय. त्यांनी केलॉगच्या उपमाबद्दलचं एक जुनं मीम शेअर केलं आणि ते पाहता पाहता व्हायरल झालंय.

केलॉग ही एक अमेरिकन फूड कंपनी असून ती एका दशकाहून अधिक काळापूर्वी भारतात आली हो. त्यांनी विविध भारतीय धान्यांच्या विविध प्रकारांपासून बनवण्यात येणाऱ्या भारतीयांच्या नाष्ट्याच्या सवयी बदलण्याचे आव्हान दिले होते आणि त्यासाठी त्यांनी पर्याय दिला  होता तो म्हणजे कॉर्नफ्लेक्स. दरम्यान, कॉर्नफ्लेक्ससारखे पदार्थ भारतीयांच्या जीभेचे चोचले जास्त काळ पुरवू शकत नाहीत, हे ओळखून या अमेरिकन कंपनीने भारतीयांचाच उपमा बनवायला सुरुवात केली. या व्हायरल मीममध्ये  केलॉग्सच्या उपम्याचे पाकिट एका शेल्फवर रचलेलं दिसतंय. त्यावर लिहिलंय की “कॅलॉग भारतात आले ते भारतीयांच्या नाष्ट्याच्या, न्याहारीच्या सवयी बदलण्याचं आव्हान देऊन आणि १० वर्षांनी हे घडलं.”

Iran Israel Attack Updates in Marathi
जप्त केलेल्या जहाजावरील १७ कर्मचारी भारतीय अधिकाऱ्यांना भेटणार, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलं स्पष्ट
Loksatta anvyarth Domestic production expansion to increase exports of electronics from India
अन्वयार्थ: भारतीय जीबी, टीबी चीनच्या स्वाधीन
Arvind Kejriwal
केजरीवालांच्या अटकेचा धक्का कोणाला आणि का?
Cambodia Cyber Slaves
कंबोडियात ५ हजार भारतीयांना बनवलं ‘सायबर गुलाम’, ५०० कोटींचा घोटाळा?

आनंद महिंद्रा यांनी उपम्याचं कौतुक करत म्हटलंय, की “केलॉगला भारतात येऊन एका दशकाहून अधिक काळ झालाय. आणि आता हे मीम इंटरनेटवर फिरतंय. आमच्या स्थानिक ‘चॅम्पियन्स’च्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नका.”

दरम्यान, महिंद्रा यांच्या या ट्विटला १२ हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं असून १२०० पेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केलंय. तसेच अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं म्हटलंय की, “आपल्या देशातील पदार्थ हे १०००च्या दशकात विकसित झाले आहेत. एकादा नवीन पदार्थ किंवा पाककृती अचानक येऊन हॉलिवूड चित्रपटासारखी त्याची जागा घेऊ शकत नाही.” तर दुसऱ्या युजर म्हणतो, “पाश्चिमात्य देशातला कोणताही पदार्थ भारतातील पराठा, पोहे, जलेबी, मिर्ची वडा, वडा पाव, मटर कुलचा, चूरमा, छोले-कुलचे, लस्सी, पुरी सब्जी, चपाती-सब्जी-दाल, दही भात, इडली, उपमा, वडा सांबर, चपाती, कबाब, गोड भात यांची जागा घेऊ शकत नाही.”