दरवर्षी जानेवारी महिन्याच्या मध्याला सूर्याचे उत्तरायण सुरू होते तेव्हा साजरी केली जाणारी संक्रांत म्हणजे आपल्या देशातला एक महत्त्वाचा सण आहे. निसर्गचक्राशी आपल्या जगण्याचे चक्र जोडून घेणाऱ्या, एकमेकांमध्ये स्नेहभाव वाढवण्याचा संदेश देणारा हा सण आज साजरा केला जात आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे सण साजरा करण्याचं रुप बदललं असून निर्बंधांचं पालन करतच सण साजरा केला जात आहे. यादरम्यान उद्योजक आनंद महिंद्रा यांनी केलेलं एक ट्वीट सध्या चर्चेत आहे.

“दरवर्षी मी देशभरातील लोकांना यावेळी साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक कापणीच्या सणासाठी शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्येक वर्षी मी अपयशी होतो आणि त्यातून एक कोणता तरी सुटतो. हा नकाशाही अपूर्ण आहे. मदत करा! कोणाकडे याची खात्रीशीर पूर्ण यादी आहे?,” अशी विचारणा आनंद महिंद्रा यांनी केली आहे.

narendra modi
प्रचार संपल्यानंतर मोदींचे रालोआ उमेदवारांना पत्र
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
Anita Sangle of Vaibhavalakshmi Builders and Developers and Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
नवोन्मेषाचा ‘तेजांकित’ सोहळा…
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन

आणखी वाचा –‘मकरसंक्रांत आणि १४ जानेवारीचा काहीही संबंध नाही’

देशभरात आज सणाचा दिवस

संक्रांतीच्या सणाला वेगवेगळी नावं असून उत्तर भारतात, हिमाचल प्रदेश- लोहडी अथवा लोहळी, पंजाब- लोहडी अथवा लोहळी; पूर्व भारतात, बिहार – संक्रांती, आसाम – भोगाली बिहु, पश्चिम बंगाल – मकर संक्रांती, ओडिशा – मकर संक्रांती; पश्चिम भारतात, महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यत: १३ जाने.), संक्रांती (सामान्यत: १४ जाने.) व किंक्रांती (सामान्यत: १५ जाने.) अशी नावे आहेत. गुजरात व राजस्थानमध्ये उतरायण (पतंगनो तहेवार) (पतंगांचा सण) साजरा करतात.

गुजरातमध्ये या दिवशी धान्य, तळलेल्या मिठाया, खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात. गुजरातेत या दिवशी गहू, बाजरी यांची खिचडी बनवली जाते. दक्षिण भारत, कर्नाटक, आंध्र प्रदेश- संक्रांती, तमिळनाडू- पोंगल, केरळ- मकर वल्लाकु उत्सव. भारताच्या अन्य भागात मकर संक्रांती नावानेच साजरी होते.

आणखी वाचा – मकरसंक्रांत आणि उत्तरायण

नेपाळमध्ये, थारू लोक – माघी. अन्य भागात माघ संक्रांती; थायलंड – सोंग्क्रान, लाओस – पि मा लाओ, म्यानमार – थिंगयान.

मकरसंक्रांत व १४ जानेवारी यांचा संबंध नाही –

मकरसंक्रांत ही नेहमी १४ जानेवारी रोजीच येते हा गैरसमज असून मकरसंक्रांत व १४ जानेवारी यांचा तसा काहीही संबंध नाही. २०१८ मध्ये मकरसंक्रांत १५ जानेवारी रोजी आली होती.

२२ डिसेंबर रोजी सूर्य जेव्हा सायन मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासूनच दिवस मोठा होत जातो. पण आपल्याकडील पंचांगे निरयन पद्धतीवर आधारित असल्याने सूर्याने निरयन मकर राशीत प्रवेश केला की मकरसंक्रांतीचा सण आपण साजरा करतो.

आणखी वाचा – तिळाचे १० फायदे : म्हणून हिवाळ्यात खाल्ले जातात तीळ-गुळाचे लाडू

दर ४०० वर्षांनी निरयन मकरसंक्रांत तीन दिवसांनी पुढे जाते. दरवर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंदाचा कालावधी साठत जाऊन दर १५७ वर्षांनी मकरसंक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो. सन २०० मध्ये मकरसंक्रांत २२ डिसेंबर रोजी, १८९९ मध्ये १३ जानेवारीला आली होती. पुढे १९७२ पर्यंत मकरसंक्रांत १४ जानेवारीलाच येत होती. १९७२ पासून १९८५ पर्यंत ती कधी १४ जानेवारी तर कधी १५ जानेवारी रोजी होती.

२१०० पासून निरयन मकरसंक्रांत १६ जानेवारी रोजी येईल. अशा प्रकारे मकरसंक्रांतीचा दिवस पुढे पुढे जात सन ३२४६ मध्ये मकरसंक्रांत १ फेब्रुवारी रोजी येणार आहे.