scorecardresearch

Premium

“यशस्वी वैवाहिक आयुष्यासाठी…”, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ! म्हणाले, “शब्दांविना…”

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी यशस्वी वैवाहिक आयुष्यावर केलेलं एक ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.

anand mahindra tweet viral
आनंद महिंद्रा यांचं ट्वीट व्हायरल!

महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे त्यांच्या हटके ट्वीट्ससाठी नेहमीच चर्चेत असतात. राजकीय मुद्द्यांपासून करोनापर्यंत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून कौटुंबिक समस्यांपर्यंत अशा सर्वच विषयांवर आनंद महिंद्रा ट्वीट करत असतात. स्पोर्ट्सवर देखील त्यांनी केलेले ट्वीट्स बरेच व्हायरल झाले आहेत. आता आनंद महिंद्रा यांनी केलेलं एक नवीन ट्वीट तुफान व्हायरल होत असून त्यातल्या व्हिडीओवर नेटिझन्सच्या देखील हटके प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

“५जी पेक्षाही अधिक पॉवरफुल”

आनंद महिंद्रांनी ट्वीट करताना एका ओळींमध्ये या व्हिडीओविषयी आपलं मत मांडलं आहे. “शब्दांविना केलेला संवाद हा ५जी तंत्रज्ञानापेक्षाही जास्त पॉवरफुल असतो”, असं आनंद महिंद्रांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यासोबत त्यांनी तो व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे.

man killed friend in love trangle
दोघांचं एकाच तरुणीवर जडलं प्रेम; जीवलग मित्रानेच तरुणाचा केला रक्तरंजित शेवट
uddhav-thackeray-and-eknath-shinde
“पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये मदत करायचो”, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले, “नशीब…”
the vaccine war
सरधोपट मांडणीत अडकलेली रंजक कथा
Case File in this Matter
मुंबईतल्या मराठी महिलेला ‘मराठी’ म्हणून हिणवत घर नाकारणाऱ्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल

काय आहे व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये एक महिला किचनमध्ये भाजी कापताना दिसत आहे. तिच्या मागे एक पुरूष मोबाईलवर काहीतरी करताना दिसतोय. हे दोघे पती-पत्नी असल्याचं व्हिडीओमध्ये दिलेल्या कॅप्शनवरून समजतंय. पतीनं किचनमधलं काम थांबवल्याचं लक्षात येताच पत्नी जोरजोरात भाजी कापू लागते. ही बाब पतीला लक्षात येताच तो मोबाईल ठेऊन पुन्हा किचनमधील काम करू लागतो असं या व्हिडीओत दिसतंय. या व्हिडीओसोबत असलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, “एका यशस्वी वैवाहिक आयुष्यासाठी एकमेकांना समजून घेण्यासाठी तुम्हाला एकमेकांसोबत बोलण्याची गरज नसते”!

या ट्वीटवर नेटिझन्सनी देखील ‘क्रिएटिव्ह’ ट्वीट्स केले आहेत. काहींनी तर उलट आनंद महिंद्रांनाच प्रश्न केला आहे.

काही ट्वीटर युजर्सनी दुसराच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

एकजण म्हणतोय, “माझ्या पत्नीच्या हातात चाकू असताना मी कधीही मोबाईलला हात लावत नाही.”

उद्योगपती आनंद महिंद्रा अमेरिकन चॅम्पियनशिपसाठी सज्ज! लिलावात स्वतःसाठी ५० हजारांची बोली लावत म्हणाले…

एका युजरनं आनंद महिंद्रांना ही शिकवण दिल्याबद्दल गुलाबजाम पाठवले आहेत!

आनंद महिंद्रांचं हे ट्वीट आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया आता व्हायरल होऊ लागल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anand mahindra tweet on successful marriage shares viral video funny reactions pmw

First published on: 18-02-2022 at 19:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×