प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहेत. त्यांनी ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेले प्रत्येक ट्विट ‘हिट’ ठरतं. यावेळीही त्यांनी एक प्रेरणादायी व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत एक मोलाचा संदेशही दिला आहे. सोशल मीडियावर हटके कल्पनांचं कौतुक करणारे आनंद महिंद्रा सर्वसामान्य लोकांमध्येही प्रचंड लोकप्रिय आहेत. असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यातून महिंद्रा यांनी दिलेला संदेश तुम्हाला प्रेरणा देईल यात शंकाच नाही!
‘हार्ड वर्क नव्हे स्मा्ट वर्क’
ट्विटरवर शेअर केलेल्या, पोस्टमध्ये एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये काही सैनिक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवले आहे. एक सैनिक पूर्ण ताकदीने दार उघडण्याचा प्रयत्न करतो. पण दुसरा माणूस येतो आणि दाखवतो की दार खरं तर अनलॉक आहे आणि ते अगदी सोप्या पद्धतीने उघडता येतं.“कामात उपाय शोधण्यासाठी तुम्हाला नेहमी दारावर टकटक करावे लागत नाही.हुशारी वापरली तर कदाचित तुमच्यासाठी दार आधीच उघडे असेल. असं कॅप्शन आनंद महिंद्रा यांनी पोस्टला दिलं आहे. थोडक्यात काय तर प्रत्येक वेळी हार्ड वर्क नाही तर स्मार्ट वर्कनेही खूप मदत होते हे सांगण्याचा प्रयत्न आनंद महिंद्रांनी केला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – वडिलांच्या रिटायरमेंटला मुलींनी दिलं खास सरप्राईज, Video बघून तुमचेही डोळे पाणावतील
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेली ही पोस्ट थोड्या कालावधीतच व्हायरल झाली. या पोस्टवर अनेक कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. दरम्यान, अशा नवनवीन गोष्टीचं लोकांना नेहमीच कुतुहल वाटत असतं. त्यामुळे सोशल मीडीयावर नेटकरी अशा व्हिडीओंना भरपूर पसंती देतात.