Anant Ambani-Radhika Merchant’s Wedding : रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या लाडक्या लेकाचा अनंत अंबानी आणि राधिकाचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी १ ते ३ मार्च दरम्यान त्यांच्यी प्री वेडिंगची जोरदार चर्चा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा मोठ्या उत्सवापेक्षा कमी नाही. गुजरातमधील जामनगरमध्ये हा सोहळा होणार असून यासाठीची तयारी सुरु झाली आहे. या सोहळ्याला भारतामधील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान यावेळी पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या रिर्टन गिफ्टचीही जोरदार चर्चा होत आहे. कारण अंबानींच्या लेकाच्या लग्नात दिली जाणारी गिफ्ट्स ही ‘मेड इन महाबळेश्वर’ असणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता तुम्हालाही जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल की मेड इन महाबळेश्वर असं नेमकं काय गिफ्ट असणार आहे? चला तर मग जाणून घेऊयात.

भारतीय संस्कृतीची झलक

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना भारतीय संस्कृतीची झलक कार्यक्रमस्थळी पाहायला मिळणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मार्चेंट यांच्या लग्नाच्या या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना महाराष्ट्राचं ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखलं जाणाऱ्या महाबळेश्वमध्ये तयार केलेली एक खास भेटवस्तू दिली जाणार आहे. महाबळेश्वरमधील नेत्रहीन कारागिरांनी तयार केलेल्या विशेष सुगंधी मेणबत्त्या पाहुण्यांना भेट दिल्या जाणार आहे. याचबरोबर गुजरातमधील कच्छ आणि लालपूरमधील महिला कामगारांनी तयार केलेले पारंपारिक स्कार्फही भेट दिले जाणार आहेत.स्वदेश ऑनलाइन या इन्स्टाग्राम पेजवरुन अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये दिल्या जाणाऱ्या भेट वस्तूंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. महाबळेश्वरमधील सनराईज कॅण्डल्स या नेत्रहीन व्यक्तींच्या मदतीने तयार केल्या जाणाऱ्या मेणबत्त्या कशा तयार केल्या जातात याची झलक दाखवली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आनंद महिंद्रांनी शाळकरी विद्यार्थींनीचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले, “अगदी छोटीशी, साधी गोष्ट पण…”

“प्रेमासाठी रस्ता उजळवण्याचं काम”

“प्रेमासाठी रस्ता उजळवण्याचं काम… अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा विवाह सोहळा पारंपारिक भारतीय कला साजऱ्या करण्यासाठी एक महत्वपूर्ण सोहळा ठरणार आहे. महाबळेश्वरमधील नेत्रहीन कारागीरांनी आपल्या हातांनी तयार केलेल्या मेणबत्त्या या सोहळ्यात दिल्या जाणार असल्याचा अभिमान वाटतोय,” अशा अर्थाची कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तुम्हीही पाहा हा व्हिडीओ..

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani radhika merchants wedding guests will receive candles from visually impaired artisans from mahabaleshwar video viral srk
First published on: 25-02-2024 at 11:36 IST