लाईव्ह बातम्या वाचताना अँकरला आली चक्कर, चालू शोमध्ये उडाला गोंधळ; घटनेचा Video व्हायरल

एलिसा सेटवरच पडल्यामुळे लाईव्ह शोमध्ये चांगलाच गोंधळ झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

News Reporter Viral Video
सध्या एका महिला अँकरचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Photo : Twitter)

सध्या अनेकांना लाईव्ह बातम्या पाहायला आवडतं. पण त्या बातम्या सांगण्याचं काम वाटतं तेवढं सोपं नसंत. कारण बातम्याचं अँकरींग करताना त्या अँकरला अनेक लहान लहान गोष्टींची काळजी घ्यावी लागते. एकजरी वाक्य चुकलं तरी ते ट्रोल होण्याची शक्यता असते. तर कधी कधी अँकरींग दरम्यान काही अपघातही होण्याची शक्यता असते.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

सध्या अशाच एका महिला अँकरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ता लाईव्ह अँकरींग दरम्यान अचानक बेशुद्ध झाल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी ७ वाजता एलिसा कार्लसन नावाची अॅंकर अँकरींगसाठी तयार झाली होती. या दरम्यान तिची प्रकृती खालावली आणि ती बेशुद्ध पडली. एलिसा सेटवरच पडल्यामुळे लाईव्ह शोमध्ये चांगलाच गोंधळ झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ही घटना पाहिल्यानंतर अनेकांनी अँकरच्या तब्येतीची चौकशी करायला सुरुवात केली.

हेही पाहा- महिलेने ऑर्डर केलेल्या जेवणात आढळला मेलेला उंदीर, रेस्टॉरंटमधील किळसवाणा Video व्हायरल

सीबीएस न्यूज चॅनलच्या सेटवरील दोन्ही अँकर या घटनेमुळे चांगल्याच घाबरल्या होत्या. याआधी त्या दोन अँकरनी एलिसाला हवामान अहवालासंबंधी बातम्या वाचण्यासाठीची माहिती दिली. यावेळी एलिसा काही बोलणार तोपर्यंत तिचा तोल गेलाआणि ती खुर्चीवरून खाली पडली. या घटनेच्या काही तासांनंतर, CBS लॉस एंजेलिसचे उपाध्यक्ष आणि वृत्त संचालक माईक डेलो स्ट्रिटो यांनी TMZ ला एलिसाच्या तब्येतीचे अपडेट दिले, आमची सहकारी एलिसा कार्लसन आज सकाळी ७ वाजताच्या बातम्यांदरम्यान आजारी पडल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही पाहा- पार्टीतील तो डान्स अखेरचा ठरला; हृदयविकाराचा झटका आला अन्…, घटनेचे CCTV फुटेज व्हायरल

चॅनलचे उपाध्यक्ष म्हणाले, “मला तिच्या सहकर्मचाऱ्यांचे आभार मानायचे आहेत ज्यांनी एलिसाचे मदत करण्यासाठी तत्काळ ९११ वर कॉल केला. एलिसावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून आम्ही सर्व तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.”

२०२४ मध्ये सेटवर केली होती उलटी –

फेसबुकवर तिच्या तब्येतीचे अपडेट देताना एलिसा म्हणाली की, ती पहिल्यापैा आता बरी आहे. २०१४ मध्ये एलिसा दुसऱ्या कोणत्यातरी चॅनलमध्ये होती आणि त्यादरम्यान तिची तब्येत बिघडली होती आणि तिला उलट्या झाल्या होत्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 18:38 IST
Next Story
विवाहित गर्लफ्रेंडसाठी पठ्ठ्याची थेट हायकोर्टात धाव; कोर्टानं ठोठावला पाच हजारांचा दंड
Exit mobile version