मंगळवारी रात्री उत्तर भारतासह पाकिस्तानातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.८ नोंदवण्यात आली आहे. पाकिस्तानात भूकंपामुळे ९ जणांचा मृत्यू आणि १०० लोक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भूकंपाचे सध्या अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या भुकंपातील असाच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पेशावरच्या पश्तो भाषेतील स्थानिक टीव्ही चॅनेलचा आहे. व्हिडीओमध्ये एक अॅंकर भूकंपाचे थेट वार्तांकन करत असताना अचानक पुर्ण स्टूडीओला आणि स्वत: अॅंकरला जोरदार हादरे जाणवले, ते हादरे इतके मोठे होते की, अॅंकर आणि त्याच्या आजूबाजूचे सर्वजण हालताना व्हिडीओत दिसत आहे.

Robbers in Pakistan
कंगाल पाकिस्तानात दिवसाढवळ्या सामान्य जनतेला लुटण्याचा विचित्र प्रकार पाहून व्हाल थक्क; एकदा Video पाहाच!
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Five Chinese nationals and their Pakistani driver were killed
पाकिस्तानात चीनच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच; आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार

हेही पाहा- अजमेरच्या यात्रेतील धक्कादायक दुर्घटनेचा Video व्हायरल, ५० फुटांवरून पाळणा कोसळला अन्…

@MeghUpdates नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, अँकर बातम्या वाचत असताना त्याच्या मागे संपूर्ण न्युजरूमदेखील हालत आहे. व्हिडीओतील महत्वाची बाब म्हणजे एवढे जोरदार हादरे बसले तरीही अँकर न थांबता आणि न घाबरता बातम्या वाचत आहे. तर नेटकरी या व्हिडिओमधील अँकरच्या संयम आणि शौर्याचे कौतुक करत असून तो व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही पाहा – Video: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! समुद्रात अडकलेल्या लोकांचं बचावकार्य सुरु असतानाच उंच लाट आली अन्…

पाकिस्तानातील लाहोर, इस्लामाबाद रावळपिंडीसह इतर भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. पाकिस्तानच्या काही भागात भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घाबरून रस्त्यावर आले होते. त्या घटनांचेही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, राजधानी दिल्लीसह भारत आणि अफगाणिस्तानच्या अनेक भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानचा हिंदुकुश प्रदेश भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भारत, पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत