scorecardresearch

…आणि राहुल गांधी चक्क मोटार सायकलवरूनच निघाले; गोवा दौऱ्यातला व्हिडीओ व्हायरल!

पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते एका दिवसाच्या गोवा राज्यात दौऱ्यावर आहेत

Rahul Gandhi on bike in goa
राहुल गांधी यांचा गोवा दौऱ्यातला व्हिडीओ व्हायरल! (फोटो: @INCGoa / Twitter )

काँग्रेस नेते राहुल गांधी गोव्यातील राज्याच्या राजधानीतील हुतात्मा स्मारक असलेल्या गोव्याच्या आझाद मैदानावर पोहोचले. यावेळी ते गोव्यातील पारंपारिक मोटर सायकल टॅक्सी- ‘पायलट’ वर पाठी (पिलियन म्हणून ) स्वार झाले होते.पक्षाच्या राज्य युनिटने हा व्हिडीओ ट्विट केला आहे.शहीद स्तंभावर पुष्पहार अर्पण करून आणि आदरांजली अर्पण करून राहुल गांधी तेथून निघाले.

पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते एका दिवसाच्या गोवा राज्यात दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळी राज्यातील समुद्रकिनारी असलेल्या वेलसाव या गावी मासेमारी करणाऱ्या समुदायाशी संवाद साधला. गोव्यासाठी पक्षाच्या रणनीतीबद्दल ते म्हणाले की “गोव्यातील लोकांचा आवाज बनणे” आणि त्यांच्या हिताचे रक्षण करायचे आहे. प्रचारादरम्यान लोकांचे म्हणणे ऐकून त्यांच्या समस्या सोडविण्याच्या संदेशावर पक्ष भर देत आहे. ते म्हणाले की त्यांचा पक्ष राज्यातील विविध भागधारकांशी चर्चा करून खुल्या आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक जाहीरनामा तयार करेल आणि त्याचा भर पर्यावरण रक्षणावर असेल.

(हे ही वाचा: “पुनीत राजकुमार यांचे ‘ते’ शब्द खरे ठरले”, चाहत्यांना भावना अनावर, चित्रपटातील संवादाचा व्हिडीओ व्हायरल! )

राहुल गांधी यांनी पायाभूत सुविधा आणि राज्य “कोळसा हब” बनण्याच्या मुद्द्यांवरही बोलले. ते म्हणाले, “आम्ही अगदी स्पष्ट आहोत की आम्हाला गोवा कोळसा हब बनवायचा नाही आणि यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा नाश होत आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-10-2021 at 17:15 IST
ताज्या बातम्या