Chandrababu Naidu Leave BJP NDA Fact Check : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात असलेली पोस्ट आढळली. ज्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू लवकरच एनडीएचा राजीनामा देऊ शकतात, असा दावा केला जात आहे. यात एबीपी न्यूज वृत्तवाहिनीवरील काही ग्राफिक्ससह ही पोस्ट केली होती, त्यामुळे आंध्र प्रदेशातील राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. पण, खरंच चंद्राबाबू नायडूंनी एनडीएबरोबरची युती तोडली का? याबाबत नेमकं सत्य काय आहे जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर आस्था यादवने एक्स हँडलवर व्हायरल ग्राफिक शेअर केले आहे.

इतर वापरकर्तेदेखील समान पोस्ट शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही योग्य कीवर्ड वापरून Google कीवर्ड सर्च चालवून आणि पोस्टमधील ग्राफिक्सवर उल्लेख असलेल्या बातम्या शोधून आमची तपासणी सुरू केली.

आम्हाला ABP Live च्या YouTube चॅनेलवर सहा वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आलेली एक बातमी सापडली.

या बातमीच्या शीर्षकात म्हटले आहे की (भाषांतर) : आंध्र में चंद्रबाबू नायडू सरकार से बीजेपी के दो मंत्रियों ने दिया इस्तीफा | ABP News Hindi

नायडू सरकारमधून भाजपाच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

आम्हाला त्याच बातम्यांचा अहवालदेखील सापडला आहे, ज्याचे ग्राफिक्स व्हायरल दाव्यासह वापरले जात आहेत.

एबीपी लाईव्हच्या यूट्यूब चॅनेलवर सहा वर्षांपूर्वी ही बातमी अपलोड करण्यात आली होती. अहवालाचे शीर्षक होते : आज इस्तीफा देंगे केंद्र में TDP के दोनों मंत्री | ABP News Hindi

निष्कर्ष : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू एनडीए सरकारपासून वेगळे झाल्याचे २०१८ मधील जुने वृत्त अलीकडील म्हणून शेअर केले जात आहे, त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.