जंगलातील प्राण्यांच्या जगण्याबद्दल आपल्या सर्वांनाच उत्सुकता असते. ते कसे आणि कुठे राहत असतील? काय खात असतील ? याविषयी सर्वांनाच जाणून घ्यायचे असते. याच कारणामुळे प्राणी तसेच पक्ष्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडीओ हे शिकारीचे असतात. जंगलात प्रत्येक वन्यप्राण्याला जगण्यासाठी प्रत्येक क्षण मोठा संघर्ष करावा लागतो, थोडीशी बेफिकरीही त्याच्या जीवावर बेतते. त्याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओसुद्धा एका शिकारीचाच आहे. या व्हिडीओमध्ये एका बिबट्याने रानडुकराची अतिशय थरारक पद्धतीने शिकार केली आहे. या शिकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिबट्या हा अत्यंत चतुर आणि चालाख शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडी किंवा गडद अंधारातही अत्यंत सराईतपणे शिकार करू शकतो. अशाच एका बिबट्यानं रानडुक्कराची शिकार केली. आश्चर्याची बाब म्हणजे, बिबट्याने रानडुक्कराची शिकारी केवळ ५ सेकंदात केली. बिबट्याचा हा वेग पाहता कोणी म्हणेल नजर हटी दुर्घटना घटी… पर्यटकांना काही कळण्याअगोदरच बिबट्याने रानडुक्कराची शिकार केली होती. पण रानडुक्कराने अशी कुठली चूक केली ज्यामुळे त्याची शिकार झाली? हे पाहूया.

दक्षिण आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्कमध्ये रानडुकराच्या शिकारीचा थरार पाहायला मिळाला. नॅशनल पार्कमधील एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात ही घटना कैद केली आहे. यामध्ये बिबट्या सापळा रचून रानडुकराची वाट पाहतो आणि संधी साधून त्याची शिकार करतो.

(हे ही वाचा:रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गुंडगिरीचे दर्शन! स्थानकावर प्रवाशाला धक्काबुक्की अन् पट्ट्याने मारहाण; घटनेचा Video व्हायरल)

हा व्हिडिओ नॅशनल पार्कच्या कॅम्पिंग स्पॉटजवळचा आहे. त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर लेटेस्ट साईटिंग्ज नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, जंगलामध्ये बराच वेळ एक बिबट्या अन्नाच्या शोधात असतो. तेवढ्याच त्याला एक रानडुक्कर दिसलं. रानडुक्कर फिरताना दिसताच बिबट्या मोठ्या चलाखीने रानडुकराचा पाठलाग करु लागला. रानडुक्कराला याची काही जाणीवही नव्हती. अन् योग्य संधी मिळताच त्याच्यावर जोरदार हल्ला करुन रानडुकराचा काम तमाम केलं. हा हल्ला इतका वेगवान होता की केवळ ५ सेकंदात डुक्कराची शिकार झाली. बिबट्याने डुकराची मान तोंडात धरली आणि झुडपात गायब झाला. हा व्हिडिओ यूट्यूबवर चांगलाच लोकप्रिय होत आहे.

येथे पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ Latest Sightings या युट्यूब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.