Crocodile Shocking Video : मगर हा सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक मानली जाते. जिच्या हल्ल्यातून भल्याभल्या प्राण्यांची सुटका होणं कठीण असते. त्यामुळे मगरीपासून सर्वच प्राणी अंतर ठेवून राहतात. एकदा का कोणता प्राणी तिच्या तावडीत सापडला तर त्याचे तुकडे केल्याशिवाय ती सोडत नाही. मगरीने प्राण्यांची शिकार केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हालाही धडकी भरेल. कारण या व्हिडीओ चक्क एक व्यक्ती मगरीच्या पाठीवर आरामात बसून फोटोसाठी पोज देतोय.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक भली मोठी मगर जमिनीवर शांतपणे पडून आहे. जिच्यावर एक माणूस बसलेला आहे, जो खूपच आनंदात दिसतोय. त्याने मगरीच्या पाठीवर बसून वेगवेगळ्या पोज देत फोटो काढले, आश्चर्याची गोष्ट म्हणजे मगरीने हल्ला करणं तर दूरचं तिने जराही हालचाल केली नाही. त्यामुळे त्या व्यक्तीच्या धाडसाचे लोक आता कौतुक करतायत. वन्य प्राणी कधी काय करतील सांगता येणं कठीण असतं. त्यामुळे लोकांनी मगरीपासूनही दूर राहणं हिताचे आहे.
मगरीच्या पाठीवर बसला अन्…
मगरीचा हा धक्कादायक व्हिडिओ @Am_Blujay या एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला.तर शेकडो लोकांनी तो लाईक करत त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडिओ पाहून एकाने गमतीने लिहिले की,”कदाचित ते चुलत भाऊ असतील,” तर दुसऱ्याने म्हटले,”तो मगरीचा मालक असू शकतो.” अनेक युजर्सनी त्या माणसाला मूर्ख म्हटले, तर काहींना विश्वास बसत नव्हता की, मगर जिवंत आहे,कारण ती काहीच हालचाल करत नव्हती.
