scorecardresearch

जनजागृती करण्यासाठी गर्भपातविरोधी संघटनेचा कार्यकर्ता चक्क ४० मजली इमारतीवर चढला अन्…

इमारतीवर चढलेला कार्यकर्ता लेट देम लिव्ह या धर्मादाय संस्थेसाठी काम करतो आणि जनजागृती करण्यासाठी तो टॉवरवर चढला होता

anti abortion activist viral stunt
एका गर्भपातविरोधी संघटनेच्या कार्यकर्त्याने केलेल्या अनोख्या स्टंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Photo : Twitter)

सध्या एका गर्भपातविरोधी संघटनेच्या कार्यकर्त्याने केलेल्या अनोख्या कृतीची घटना सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. शिवाय ही घटना वाचून अनेकांनी त्या कार्यकर्त्यावर टीका केली आहे. तर काहींनी असं करण्यामागे त्याचा हेतू प्रामाणिक असल्याचं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी फिनिक्सच्या डाउनटाउनमधील ४० मजली चेस टॉवरवरती चढून डेस चॅम्प्स नावाच्या व्यक्ताने अनोखा स्टंट केला.

स्थानिक मीडियाने सांगितलं की, या भागात सुपर बाउल LVII चे आयोजन होणार आहे. या आधी हा गर्भपात विरोधी कार्यकर्ता टॉवरवर चढला. तर फिनिक्स अग्निशमन विभागाचे कॅप्टन टॉड केलर यांनी तब्बल ४८० फूटांवर जाऊन आल्यानंतर थरारक अनुभव पत्रकारांना सांगितला ते म्हणाले की, “या कार्यकर्त्याने केलेला हा एक मूर्खपणा आहे. शिवाय या मुर्खपणामुळे त्याने केवळ स्वतःलाच नव्हे तर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनाही धोक्यात आणलं आहे.” दरम्यान, या घटनेनंतर डेस चॅम्प्सला ताब्यात घेण्यात आले की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. कारण या घटनेनंतर फिनिक्स पोलिस घटनास्थळी लगेच पोहचेले नव्हते अशीही माहिती समोर आली आहे.

हेही पाहा- भावाला वाचवण्यासाठी चिमुकलीने तब्बल १७ तास… टर्कीमधला ‘तो’ फोटो होतोय व्हायरल

महत्वाची बाब म्हणजे या कार्यकर्त्याने रविवारी कॅन्सस सिटी चीफ्स आणि फिलाडेल्फिया ईगल्स यांच्यात ग्लेनडेल, ऍरिझोना येथे खेळल्या जाणार्‍या सुपर बाउल LVII साठी आलेल्या लाखो क्रीडा चाहत्यांचे लक्ष वेधण्यासाठी हा स्टंट केला. दरम्यान, सर्व घटनेनंतर डेस चॅम्प्सने त्यांच्या वेबसाइटवर सांगितले की, लेट देम लिव्ह या धर्मादाय संस्थेसाठी जनजागृती करण्यासाठी तो या टॉवरवर चढला होता. ही संस्था महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचा गर्भपात रद्द करण्यास मदत करते. अशाच एका होप नावाच्या महिलेचा गर्भपात रोखण्यासाठी पैसे गोळा करत असल्याचंही त्याने सांगितलं.

हेही पाहा- इच्छा तिथे मार्ग! अपंग मुलीचा बल्ब बनवतानाचा Video शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले, “माझा देश…”

अमेरिकेत गर्भपात हा एक संवेदनशील मुद्दा असून महिलांना गर्भपाताचा अधिकार द्यायचा की नाही यात धार्मिक घटकांचाही सहभाग असल्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात हा मोठा मुद्दा माणला जातो. दरम्यान,गर्भपात विरोधी कार्यकर्ता कोणत्याही आधाराशिवाय या उंच इमारतीवर चढला होता, त्यामुळे असा अनोखा स्टंट करणं त्याच्या जीवावर बेतू शकलं असतं. शिवाय या आधीही तो अशा इमारतींवरती चढल्याचं सांगितलं जातं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 10:08 IST
ताज्या बातम्या