Apara Ekadashi Vrat 2026: हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला खूप महत्वपूर्ण मानले जाते. या दिवशी अनेक विष्णू भक्त उपवास करतात, त्यांची पूजा-आराधना करतात. एकादशी तिथी प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष अशा दोन्ही पक्षात साजरी केली जाते. सध्या वैशाख महिना सुरू असून या महिन्यामध्ये अपरा एकादशीचे व्रत केले जाईल. या एकादशीला अचला एकादशी देखील म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या एकादशीला श्री विष्णूंची पूजा-आराधना केल्याने आयुष्यातील सर्व सुख प्राप्त होते. दरम्यान, सध्या गूगल ट्रेंडवरदेखील अपरा एकादशी व्रक कथा हा कीवर्ड ट्रेंड होत आहे.

अपरा एकादशी २०२६ शुभ मुहूर्त आणि तिथी

पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात १२ मे रोजी दुपारी ०२ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होईल, तसेच ही तिथी १३ मे रोजी दुपारी ०१ वाजून २९ मिनिटांपर्यंत असेल. परंतु, उदय तिथीनुसार हे व्रत १३ मे रोजी केले जाईल. व्रताचे पारण १४ मे रोजी पहाटे ०५ वाजून ३१ मिनिटांपासून ते सकाळी ०८ वाजून १४ मिनिटापर्यंत असेल.

अपरा एकादशी महत्व

धार्मिक मान्यतेनुसार, अपरा किंवा अचला एकादशीला उपवास केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनात सकारात्मकता येते. असे म्हटले जाते की या दिवशी योग्य विधींसह भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते. याचा उल्लेख पौराणिक कथांमध्येही आढळतो, भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला या व्रताचे महत्त्व समजावून सांगितले आणि ते पाळण्याचा सल्ला दिला. ही एकादशी केवळ भौतिक सुखच देत नाही, तर मोक्ष प्राप्तीचा मार्गही मोकळा होतो. असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांना आशीर्वाद लाभतो.

या मंत्राचा जप करा

‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा सतत जप करा आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करा.

अपरा एकादशीला या गोष्टी करू नका

  • एकादशीला भात खाण्यास सक्त मनाई आहे.
  • एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत. पूजेसाठी पाने एक दिवस आधी (द्वादशीपूर्वी) तोडावीत.
  • लसूण, कांदा, मांस किंवा मद्यपान करू नका.
  • या दिवशी केस कापणे, दाढी करणे किंवा नखे ​​कापणे शुभ मानले जात नाही.
  • कोणाशीही अपमानास्पद भाषेत बोलू नका आणि घरात शांतता राखा.
(फोटो सौजन्य: Google Trend)

दरम्यान, सध्या गूगल ट्रेंडवरदेखील अपार एकादशी व्रत कथा हा कीवर्ड ट्रेंड होत आहे. वर दिलेल्या गूगल ट्रेंड्सच्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता, मागील पाच तासांमध्ये वीस हजारांपेक्षा अधिक युजर्सनी ‘अपार एकादशी व्रत कथा’ हा कीवर्ड सर्च केला आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)