Apple चे सीईओ टिम कुक यांनी भारतीय छायाचित्रकारांचे फोटो शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी शेअर केलेल्या या खास पोस्टची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. नेटीझन्सला ही पोस्ट खूप आवडल्याचेही दिसून येतं.

tim-cook-diwali-msg
व्हायरल पोस्ट (फोटो : @tim_cook / Twitter , Reuters / File)

अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी एका भारतीय छायाचित्रकाराने क्लिक केलेला फोटो शेअर करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.ट्विटरवर , टेक जायंटच्या प्रमुखाने दिल्लीस्थित ट्रॅव्हल फोटोग्राफर गुरसिमरन बसरा (@coffeekarma) यांनी टिपलेले दोन सुंदर फोटो ट्विट करून त्यांच्या फॉलोअर्सला आश्चर्यचकित केले. त्यांनी केलेल्या या खास पोस्टची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. नेटीझन्सला टिम कुक यांनी केलेली ही पोस्ट खूप आवडल्याचेही दिसून येतं.

काय आहे फोटोमध्ये?

एका फोटोमध्ये कागदाचा कंदील एका महिलेद्वारे सोडत असल्याचा क्षण दाखवला आहे तर दुसर्‍या फोटोमध्ये मातीचे दिवे आणि एक हात दिसत आहे . या सुंदर फोटोसह इको-फ्रेंडली दिवाळीचे वातावरण उत्तम प्रकारे टिपले आहे.

( हे ही वाचा: “एक जग, एक सूर्य, एक मोदी…”, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींचं केलं हटके कौतुक! व्हिडीओ व्हायरल! )

टिम कुक यांची पोस्ट

“जगभरातील दिवाळी साजरी करणाऱ्या सर्वांना आनंदी आणि सुरक्षित दिवाळीच्या शुभेच्छा. लाइट्सचा सण तुमचे घर आनंदाने आणि आरोग्याने भरून जावो,” या कॅप्शनसह टिम कुक यांनी भारतीय छायाचित्रकाराला टॅग करत ट्विट केले.

( हे ही वाचा: भारतानं अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट चाहते बिथरले! ट्विटरवर सुरू झाला #Shame ट्रेंड! )

सणासुदीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देताना त्याच्या स्वतःच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर फोटो शेअर करत छायाचित्रकार सराने लिहिले, “टिम कूक यांनी जगाला दिवाळीच्या शुभेच्छा देताना आपले फोटो शेअर करतात तेव्हा खूप आनंद होतो,” असं त्याने लिहलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Apple ceo tim cook shared indian photographer photo and wished happy diwali ttg