Apple iPhone 16 Viral Video : भारतात आज Apple iPhone 16 लाँच झाला आहे, ज्याला देशभरातील ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. मुंबई, दिल्लीतील Apple स्टोर उघडण्याआधीच ग्राहकांनी बाहेर लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. कंपनीच्या मुंबईतील वांद्रे बीकेसीतही स्टोअरबाहेरदेखील ग्राहकांची सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती, त्यामुळे भारतात ॲपल आयफोनविषयी लोकांमध्ये असलेली एक मोठी क्रेझ दिसून आली. अशातच मुंबईतील ॲपल स्टोअरमध्ये आलेल्या एका ग्राहकाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण या मुंबईकर ग्राहकाने ॲपल स्टोअरमधून चक्क एकाचवेळी एक दोन नाही, तर तब्बल पाच आयफोन खरेदी केले आहेत, ज्याचा व्हिडीओ पाहून आता युजर्सही अवाक् झालेत.

एक, दोन नाही तर एकाचवेळी खरेदी केले ५ ‘आयफोन १६’ ( Mumbai iPhone 16 Launch)

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुंबईतील ॲपल स्टोअरमध्ये एक व्यक्ती एक दोन नाही तर चक्क पाच आयफोन १६ एकाचवेळी खरेदी करून स्टोअरबाहेर निघताना दिसत आहे. आयफोन १६ भारतात लाँच होताच तो खरेदी केल्यानंतर झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय. यावेळी त्याने पिशवीतून खरेदी केलेला एक एक आयफोन बॉक्सबाहेर काढून दाखवला. विशेष म्हणजे हे पाच आयफोन त्याने त्याची पत्नी आणि मुलांसाठी खरेदी केले आहेत.

EY toxic culture controversy ashneer grover
Ashneer Grover EY story: “एक कोटी पगार; तरीही पहिल्याच दिवशी पळालो” अशनीर ग्रोवरनं सांगितला EY कंपनीतील धक्कादायक अनुभव
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
EY India has denied allegations of "work pressure" after Anna Perayil's mother made the claims
EY Employee Death : कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झालेल्या ॲनाच्या वडिलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ती रात्री साडेबारापर्यंत…”
Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan
Bigg Boss Marathi Winner : ‘गुलीगत धोका’ म्हणत सूरज चव्हाण ठरला पाचव्या पर्वाचा महाविजेता!
Ganesh Visarjan 2024
Ganesh Visarjan 2024: गणपती बाप्पाबरोबर चार लाखांच्या सोन्याच्या साखळीचेही विसर्जन; मग काय १० हजार लिटर पाणी उपसलं, अन्…
Mumbai: Video Of Last Man To Take Darshan Of Lalbaugcha Raja Goes Viral
“वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO

आयफोनवेड्या मुंबईकराचा व्हिडीओ व्हायरल

यावर एएनआयशी बोलताना त्याने सांगितले की, मी हे मोबाइल माझी पत्नी आणि मुलांसाठी खरेदी केले आहेत. कंपनी खूपच चांगली सेवा देते. दरम्यान, आयफोनवेड्या मुंबईकराचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय, ज्यावर लोकही वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.

@AHindinews या वृत्तसंस्थेने एकाचवेळी पाच आयफोन १६ खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केला आहे, ज्यावर लोकही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘हा आता दुसऱ्या देशात जाऊन हे आयफोन विकणार’, दुसऱ्या एका युजरने म्हटले की, ‘या व्यक्तीचा इनकम टॅक्स रेकॉर्ड चेक केला पाहिजे.’ तिसऱ्या युजरने म्हटले की, ‘मायानगरी मुंबईची गोष्टचं काही वेगळी आहे.’ शेवटी एकाने म्हटलेय की, ‘बघा बघा लोक कसे किडनी विकून आयफोन खरेदी करण्यासाठी उभे आहेत.’

Read More News : “जीव एवढा स्वस्त असतो का?” पतीबरोबर वाद अन् झालं होत्याचं नव्हतं; रागावलेल्या पत्नीने तलावात मारली उडी अन्…; पाहा video

“आयफोन खरेदीसाठी लोक दुबईला जातात, मी तर मुंबईत आलोय”, युजरची प्रतिक्रिया

दरम्यान, देशभरातील अनेक आयफोनप्रेमी लोक मुंबईत दाखल झाले आहेत. अशाचप्रकारे शरीफ समशीर नावाचा एक तरुण देखील आयफोन खरेदी करण्यासाठी चक्क अहमदाबादवरून प्रवास करत मुंबईतील बीकेसीमधील आयफोन स्टोरमध्ये पोहोचला. तो ॲपल स्टोअरबाहेर लागलेल्या लांब रांगेत तो उभा होता. यावेळी आरएनओ वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणाला की, आयफोनविषयी इतकी क्रेझ आहे की, लोक तो खरेदी करण्यासाठी दुबईत जातात, मी तर मुंबईत आलोय. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, भारतातील तरुणांमध्ये खास करून आयफोनविषयी किती क्रेझ आहे.