अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प हिच्यासोबत कॉफी डेटला जाण्यासाठी आतापर्यंत चक्क ३३ लाखांची बोली लावण्यात आली आहे. ही किंमत वाढत जाण्याची शक्यता आहे. तिच्यासोबत कॉफी डेटला जाण्यासाठी ऑनलाइन लिलाव सुरू होता. सुरुवातीला या बोलीची किंमत साडेपाच लाख होती नंतर ही किंमत वाढत गेली.
वाचा : हटके करण्याच्या नादात मुलाने नाकारला वडिलांचा अब्जावधींचा व्यवसाय
इवांका ही आपल्या आपला भाऊ एरिकच्या सेवाभावी संस्थेला मदत करण्यासाठी पैसे गोळा करत आहे. यासाठी तिने कॉफी डेट ठेवली आहे. जो उच्च बोली लावेल त्याच्या सोबत इवांका ही कॉफी डेटला जाईल. लिलावातून आलेली रक्कम इवांका ही दान करणार आहे. पाच डिसेंबरला कॉफी डेटचा लिलाव सुरू झाला. आतापर्यंत तिच्यासोबत कॉफी डेटला जाण्यासाठी ३३ लाखांची बोली लावण्यात आली आहे. विजेत्याला इवांका ट्रम्प परिवाराच्या ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलमध्ये भेटणार आहे. १ जानेवारी २०१७ ते १ जानेवारी २०१८ या वर्षभराच्या काळात एकदा इवांका या विजेत्याची भेट घेईल. विजेत्याला तिच्यासोबत अर्धा तास वेळ घालवता येणार आहे.
Click Here to Bid on a Private Coffee with Ivanka Trump in NYC or DC to benefit The @EricTrumpFdn for @StJude! https://t.co/QuEO67Yj7Z
— The Eric Trump Fdn (@EricTrumpFdn) December 6, 2016
इवांकाचे वय ३५ वर्षे आहे. इवांका ही मॉडेलिंग करायची. ट्रम्प परिवाराचा रिअल इस्टेट आणि हॉटेलिंगचा व्यवसायही ती संभाळते. अमेरिकन राष्ट्रध्यपदाच्या निवडणुकीच्या वेळी ट्रम्प यांची कन्या इवांका ही चर्चेत आली होती. ट्रम्प यांनी आपल्या मुलीवर आक्षेपार्ह टिप्प्णी केली होती त्यामुळे, इवांका ही चर्चेत आली होती.