वाहन चालवताना वाहतूकीच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते कारण आपली एक चूक आपल्या किंवा इतरांच्या जीवावर बेतू शकते. विशेषत: पावसाळ्यात वाहन चालवताना जास्त सावधगिरी बाळगावी लागते. पावसामुळे रस्ते निसरले झालेले असतात, कधी रस्त्यावर पाणी साचलेले असते अशा रस्त्यावरून जर एखादा भरधाव वेगाने वाहन चालवत असेल तर वाहन घसरून मोठा अपघात होऊ शकतो. सध्या अशाच एका अपघाताच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ एका कारच्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झालेला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, ही कार एका महामार्गावर धावत आहे. कारच्या समोर काही वाहने धावत आहे. दरम्यान कारच्या एका बाजूने ट्रक भरधाव वेगाने धावताना दिसत आहे. दरम्यान अचानक रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसते. कारचा वेग कमी होतो पण बाजून जाणारा ट्रक भरधाव वेगाने रस्त्यावरी पाण्यातून जातो आणि त्याचे ट्रक रस्त्यावरून घसरतो. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटते आणि ब्रेक मारल्याने जो अचानक रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकतो. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा येईल. कारचालकाचा जीव थोडक्यात वाचला आहे. हेही वाचा - ‘आयुष्य म्हणजे खेळ नव्हे!’, चिमुकलीच्या डोळ्यांसमोर धबधब्यामध्ये वाहून गेली आई, Viral Video पाहून उडेल थरकाप व्हिडिओ marathi_autoguru नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, रस्त्यावर पाणी दिसताच गाडीचा वेग कमी करा. व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, "ब्रेक सेटिंग बरोबर नसल्यामुळे ब्रेक दाबल्यावर गाडी पाण्यात गाडी फिरली, अकॉल्पॅनिंग वैगरे काही आहे." हेही वाचा - “ही खरी महाराष्ट्राची संस्कृती!”, वयाची पर्वा न करता स्वच्छता कर्मचारी असलेल्या मावशींनी सादर केली अफलातून लावणी, Video चर्चेत अपघात नक्की कसा झाला हे सांगताना marathi_autoguruने सांगितले की, "बऱ्याच लोकांना वाटत असेल की रनेब्रेक दाबल्यामुळे ट्रक ब्रेक दाबावा लागला. aquaplaneचे च कारण आहे."१) अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम असेल तर वाहन असे घसरत नाही या प्रकरणामध्ये सरळ थार ठोकले असते अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम अॅक्टिव्ह तरी aquaplane होऊ शकते.२). हा कंटेनर ट्रक जास्त टायरचा असता तर स्किड झाला नसता.३) लोड नक्कीच कमी असणार आहे लोडेड असता तर स्किड न होता थारला ठोकले असते किंवा थांबला असता४. टायरची अवस्था हे ही एक कारण असते५. आता कमीलोड मुळे aquaplane तयार झाले आहे.