Father-daughter Viral video:  लेक माहेराच सोनं, लेक सौख्याच औक्षण, लेक बासरीची धूण, लेक अंगणी पैंजण…मुलींना परकं धन समजलं जातं, कारण एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण आईवडीलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही. वडील आणि मुलीचं नातं खूपच खास असतं. मुलं आईच्या खूप जवळची असतात,तर मुली वडिलांच्या खूप जवळच्या असतात, असं म्हटलं जातं. आपल्याला इंटरनेटवर बाप-लेकीच्या प्रेमाचं, त्यांच्या बाँडिंगचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. जी पोरगी आयुष्यभर आई-बापाच्या कुशीत वाढली, जिला हवं ते मिळत होते, ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते. ज्या माहेरच्या घरात मुलगी लहानाची मोठी होते, त्या घरातून काढता पाय घेताना कोणत्याही मुलीचे अंतकरण जड होते. माहेरातून सासरच्या घरी निघतानाचा हा हळवा प्रसंग प्रत्येक घरात अनुभवायला मिळतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आपल्याला माहिती आहे आर्मीमध्ये असणारे आपले जवान किती कठोर असतात. त्यांना देशसेवा करण्यासाठी इतकं कठोर बनावं लागतं की त्यांना स्वत:च्या भावनांनाही आवर घालावा लागतो. मात्र एक क्षण असा येतो की हा कठोर आर्मीमॅनही धायमोकलून रडतो. तो क्षण म्हणजे लेकीचं लग्न. अशाच एका जवानाचा लेकीच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी येईल.

Supriya sule on dhonde jevan
“मुलीच्या किंवा मुलाच्या आई-वडिलांना पाय धुवायला लावू नका, त्याऐवजी…”, धोंडी जेवणाबाबत सुप्रिया सुळेंची कळकळीची विनंती!
Loksatta editorial Horrific Murder In Vasai Boyfriend Stabs Girlfriend To Death With Iron Spanner
अग्रलेख: लक्षणाची लक्तरे..
why after marriage while living in family many things in nature of partner start to change
इतिश्री: लग्नानंतर घडतंय बिघडतंय कशामुळे?
Wedding Honeymoon Night Turned Nightmare
मधुचंद्राच्या रात्रीला भयंकर वळण! नवरीच्या ‘या’ आरोग्य स्थितीने नवऱ्याला बसला धक्का, डॉक्टरांकडून ऐका कहाणी व उपाय
emotional video
अचानक कोणी आलं अन् हातात चिठ्ठी दिली! टेन्शनमध्ये बसलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावर काही क्षणात हसू आलं; काय होतं चिठ्ठीमध्ये? पाहा Video
man killed son by stuffing bunch of notebook pages in his mouth
शहापूर : तोंडात वहीच्या पानांचा बोळा कोंबून पित्याकडून मुलाची हत्या
minor girl was sexually assaulted by forcing her to drink beer in Kalyan
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीला बिअर पाजून लैंगिक अत्याचार
panvel crime news
पनवेल: बहिणीसोबत एकटा घरात दिसल्याने त्याला ठार केले, तळोजातील घटना

लग्न आणि त्यानंतरचे सर्व विधी आटोपून येणारा निरोपाचा क्षण नववधूच्या मातापित्यासह सर्वांनाच जड जातो. महिने-दोन महिने लग्नाच्या गडबडीत सहज निघून जातात मात्र शेवटच्या क्षणी सगळ्यांचाच कंठ दाटून येतो. अशाच एका लेकिच्या पाठवणीला आई-वडिलांचा कंठ दाटून आलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आई-वडिल आपल्या लेकीला घेऊन मांडवाच्या एका बाजूला धायमोकलून रडताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बुलेट थांबवली म्हणून वाहतूक पोलिसालाच लगावली कानशिलात; मात्र शेवट असा झाला की…VIDEO पाहून व्हाल अवाक्

हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट करत आपल्या लेकीच्या पाठवणीचे क्षण आठवत आहेत. हा व्हिडीओ madhurimore_makeover या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.