Premium

Video : गणेशोस्तवानिमित्त सादर केलं सुंदर फलक रेखाटन; कलाकाराच्या कलेचं होतंय कौतुक

गणेशोस्तवानिमित्त ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावर एका कलाकाराने सुंदर असे फलक रेखाटन सादर केलं आहे.

Artist presented a beautiful panel drawing combining of ganeshostav and amchya papani ganpati anla
(सौजन्य:इन्स्टाग्राम/@devhire) Video : गणेशोस्तवानिमित्त सादर केलं सुंदर फलक रेखाटन; कलाकाराच्या कलेचं होतंय कौतुक

Viral Video : गणेशोत्सवादरम्यान सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. आज घराघरात गौराईचे आगमनदेखील होईल. यातच सध्या सोशल मीडियावर, मोबाईलवर एकच गाणं वाजतंय, ते म्हणजे ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला.’ या व्हिडीओतील चिमुकल्याच्या अभिनयाने अनेकांची मने क्षणात जिंकली आणि साईराज रातोरात स्टार झाला; तर विविध माध्यमांतून या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावर काही जण भजन, इन्फ्लुएन्सर रील किंवा मजेशीर व्हिडीओसुद्धा बनवताना दिसून आले आहेत. आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत गणेशोस्तवानिमित्त ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावर एक कला सादर केली आहे. एका कलाकाराने सुंदर असे फलक रेखाटन सादर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक व्यक्ती मोठ्या फळ्यावर खडूने चित्र काढत आहे. फळ्यावर शंकर आणि पार्वतीच्या कुशीत गणपतीचे चित्र खडूच्या मदतीने रेखाटले आहे. तसेच बाजूला साईराजचे चित्र रेखाटून ‘आमच्या पप्पांनी गंपती आणला, टुकूमुकू बघतोय चांगला’ या गाण्याच्या दोन ओळी लिहिण्यात आल्या आहेत. शंकर-पार्वती आणि गणपतीच्या सुंदर चित्रासोबतच साईराजचेसुद्धा हुबेहूब हावभाव चित्रात रेखाटले आहेत, जे तुम्ही एकटक बघत रहाल…गणेशोस्तवानिमित्त ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर सादर केलेलं फलक रेखाटन एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा… VIDEO : जेव्हा मराठमोळ्या आजीला नात हिंदी गाणं शिकवायला जाते…; व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर हसू आवरणार नाही…


व्हिडीओ नक्की बघा
:

गणेशोस्तवानिमित्त सादर केलं सुंदर फलक रेखाटन :

फलक रेखाटन सादर करणाऱ्या कलाकाराचे नाव ‘देव हिरे’ असे आहे. हे कलाकार ग्रामीण भागातील शाळेत खडूच्या सहाय्याने फळ्यावर सुंदर चित्रे रेखाटताना दिसतात. या आधीसुद्धा त्यांनी अनेक विषयांवर आणि सणांदरम्यान सुंदर सादरीकरण चित्रांद्वारे सादर केलं आहे; तर आज पुन्हा एकदा त्यांनी कलेच्या मदतीने गणेशोस्तवानिमित्त ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावर अद्भुत फलक रेखाटन केलं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ कलाकार यांच्या @devhire या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ‘गणेशोत्सव फलक रेखाटन’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. अनेक जण कलाकाराची कला पाहून ‘तुमच्या कलेला सलाम’, ‘तुमच्या कलेला तोड नाही’, ‘सर तुम्ही अप्रतिम कलाकार आहात’, ‘सर शब्दात व्यक्त होणार नाही, अशी चित्रे असतात तुमची’; अशा विविध शब्दांत व्हिडीओ पाहणारे कमेंट करताना दिसून आले आहेत. तसेच कलाकाराने त्यांच्या कलेवर प्रेम करणाऱ्या नेटकऱ्यांचे खास संदेश लिहून कमेंटमध्ये आभार मानले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Artist presented a beautiful panel drawing combining of ganeshostav and amchya papani ganpati anla asp

First published on: 21-09-2023 at 18:40 IST
Next Story
डॉक्टरांचे कौतुक करावे तितके कमी, मजा-मस्तीमध्ये टोचले इंजेक्शन; चिमुकल्याला कळलेसुद्धा नाही, व्हिडीओ एकदा पाहाच