scorecardresearch

Premium

शिकण्यासारखं… हात नसतानाही तो करतोय वृक्ष लागवड; ‘हवा येऊ द्या’ फेम अरविंद जगताप Video शेअर करत म्हणाले..

वृक्ष संवर्धन या विषयावरून राज्यात वादळ उठलं असताना लेखक अरविंद जगताप यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत

Arvind Jagtap Shares Emotional Video
(फोटो: Facebook/अरविंद जगताप)

वृक्ष संवर्धन या विषयावरून राज्यात वादळ उठलं असताना लेखक अरविंद जगताप यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अवघ्या २२ सेकंदाचा हा व्हिडीओ डोळ्यात अंजन घालण्याचं काम करतो अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. पण असं या व्हिडीओ मध्ये नेमकं आहे काय हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना?

अरविंद जगताप यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ मध्ये एक तरुण शेतात झाड लावताना दिसत आहे. हा तरुण हाताने अधू असूनही आपल्याला शक्य होईल अशा पद्धतीने या झाडाच्या अवती भोवती माती लावताना पाहायला मिळतोय. हा व्हिडीओ शेअर करत जगताप यांनी “काळजाला हात घातला या मित्राने” असं कॅप्शन देत या तरुणाच्या मेहनतीचं कौतुक केलं आहे. तसेच वटवृक्षासारखा मोठा हो असे म्हणत त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

uddhav-thackeray-and-eknath-shinde
“पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये मदत करायचो”, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले, “नशीब…”
Young Man rescue scared puppy
VIDEO: घाबरलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्यासाठी देवदूत बनला तरुण; जीवाची पर्वा न करता भरधाव वाहनांमधून गेला पळत
herd of sheep eats 100 kg of cannabis in greece after storm daniel floods now behaving strang
झिंगाट बातमी! मेंढ्यांनी गवत समजून खाल्ली १०० किलो गांजाची पानं; मग झालं असं काही की…
Case File in this Matter
मुंबईतल्या मराठी महिलेला ‘मराठी’ म्हणून हिणवत घर नाकारणाऱ्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल

अरविंद जगताप यांनी शेअर केला हा Video

दरम्यान या व्हिडीओ वर अनेकांनी कमेंट करून या तरुणाला शाबासकी दिली आहे. धडधाकट मंडळी झाडांच्या जीवावर उठलीत आणि तुझ्यासारखी माणसं जीवापलीकडे झाडांना जपत आहेत अशा शब्दात काहींनी सध्याच्या आरे वादावरही टिप्पणी केली आहे.

दरम्यान अरविंद जगताप हे अनेक वर्षांपासून वृक्ष लागवड व संवर्धनाचं काम करत आहेत. २०१९ मध्ये त्यांना शेतकरीवाद प्रसारक मंडळ (SPM) यांच्यातर्फे पहिला राष्ट्रीय झाड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. अरविंद जगताप यांनी यापूर्वी आपल्या वडिलांच्या वाढदिवशी ७५ देशी वृक्षांची लागवड करूनही एक वेगळा पायंडा घातला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arvind jagtap shares video of handicapped person working in farm tree plantation svs

First published on: 06-08-2022 at 10:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×