Live : थेट पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्यातून विठ्ठल-रुक्मिणीचं लाइव्ह दर्शन

करोनामुळे यंदाची आषाढी वारीदेखील प्रतीकात्मक आणि मोजक्याच भाविकांच्या सोबत साजरी केली जात असली तरी ऑनलाइन दर्शनाची सोय सर्वांना उपलब्ध करुन देण्यात आलीय

Ashadi Ekadashi 2021 Pandharpur Vitthal Rukmini

ज्या नगरीत टाळ मृदुंगांचा जयघोष.. हरिनामाचा जय जयकार.. भाविकांची मांदियाळी पाहावयास मिळते अशी पंढरी नगरी सुनीसुनी आहे. करोनामुळे यंदाची आषाढी वारीदेखील प्रतीकात्मक आणि मोजक्याच भाविकांच्या सोबत साजरी केली जाते. करोनाचे संकट दूर होऊ  दे आणि पायी वारी आणि सावळ्या विठुरायाचे दर्शन होऊ दे,अशी आर्त विनवणी भाविक करीत आहेत.

ऊन- वारा- पाऊस याची तमा न बाळगता वारकरी शेकडो मैल पायी चालत पंढरीच्या वारीला येतो. मृग नक्षत्राची चाहूल लागली की शेतकरी आनंदी होतो, त्या प्रमाणे वारकऱ्यांना ओढ  लागते सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची. आषाढी वारीला लाखो भाविक पंढरीला येतात. मात्र करोना मुळे सुरवातीला चैत्री त्यानंतर आषाढी,कार्तिकी,माघी आणि या नवीन वर्षांतील चैत्र आणि आता आषाढी अशा सहा वारींवर करोनाचे संकट होते. त्यामुळे देवाचे दर्शन आणि पायी वारी लाखो भाविकांची होऊ शकली नाही. त्यामुळे मंदीर प्रशासनाने भाविकांसाठी विठ्ठल-रुक्मिणीच्या लाइव्ह दर्शनाची विशेष सोय केलीय…

लाईव्ह दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा

पंढरपुरात २५ जुलै पर्यंत संचारबंदी लागू केली आहे.आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या (मंगळवारी) पहाटे पार पडली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ashadi ekadashi 2021 vitthal rukmini live darshan scsg

ताज्या बातम्या