scorecardresearch

VIRAL : झोपलेल्या गर्लफ्रेंडच्या पापण्या उघडल्या आणि फोन अनलॉक करून १८ लाखांचा चूना लावला

हल्ली बहुतेक स्मार्टफोनमध्ये फेशियल रेकग्निशन लॉक असतात. असे फोन यूजरच्या चेहऱ्याशिवाय अनलॉक करता येत नाहीत, पण या फेस लॉक फीचरचाच फायदा घेत एका मुलाने त्याच्या झोपलेल्या गर्लफ्रेंडचा फोन अनलॉक केला आणि तिच्या बँक खात्यातून चक्क १८ लाख रुपये ट्रान्सफर केले. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात सविस्तर…

boyfriend-stole-rs-18-lakh-of-girlfriends-phone-facial-recognition
(File Photo)

हल्ली बहुतेक स्मार्टफोन फेशियल रेकग्निशन लॉकसह येतात. फोनमधील डेटा आणि इतर वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी फोनमधल्या फेशियल रेकग्निशन लॉक मदतीचं ठरत असतं. कारण असे फोन यूजरच्या चेहऱ्याशिवाय अनलॉक करता येत नाहीत, पण या फेस लॉक फीचरचाच फायदा घेत एका मुलाने त्याच्या झोपलेल्या गर्लफ्रेंडचा फोन अनलॉक केला आणि तिच्या बँक खात्यातून चक्क १८ लाख रुपये ट्रान्सफर केले. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात सविस्तर…

ही धक्कादायक घटना चीनमध्ये घडलीय. या घटनेची आता जगभरात चर्चा सुरूय. एका मुलाने त्याची गर्लफ्रेंड झोपलेली असताना तिच्या डोळ्याच्या पापण्या उघडून फोन अनलॉक करून १८००० पौंड (१८ लाख रुपये) चोरल्याची विचित्र घटना घडलीय. या प्रकरणी त्याला तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. सुरूवातीला त्याने फिंगरप्रिंटच्या मदतीने फोन अनलॉक केला. त्यानंतर तिच्या फोनमधला Alipay मोबाइल पेमेंट अॅप उघडण्याचा प्रयत्न केला. पण गर्लफ्रेंडने तिच्या फोनवर फेशियल रेकग्निशन अॅक्टिव्ह केलं होतं. ती झोपलेली असताना बॉयफ्रेंडने गुपचूप तिच्या डोळ्याच्या पापण्या उघडल्या आणि तिचा फोन अनलॉक केला. त्यानंतर त्याने गर्लफ्रेंडच्या फोनमधून बँक खात्यातून सुमारे £18000 चोरले. ही विचित्र घटना ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. गर्लफ्रेंड झोपलेली असताना त्याने तिच्या डोळ्याच्या पापण्या उघडल्या पण तरीही तिला जाग कशी आली नाही, असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल.

आणखी वाचा : Firing In Marraige : लग्नात नवरदेवाने नवरीचा हात पकडत हवेत केली फायरिंग; पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO

या चोरट्या बॉयफ्रेंडचं नाव हुआंग असं आहे. हुआंग २८ वर्षांचा आहे. डोंग नावाची मुलगी त्याची गर्लफ्रेंड होती. दोघेही गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका हॉटेलमध्ये थांबले होते. यादरम्यान दोघेही बराच वेळ बोलत राहिले. मध्येच त्या मुलाने स्वयंपाक करून तिला खाऊ घातलं होतं. तिच्या जेवणात या मुलाने झोपेच्या गोळ्या मिसळल्याचा आरोप करण्यात आला आहे. जेवण खाल्ल्यानंतर डोंग बेशुद्ध पडली.

डोंग बेशुद्ध झाल्यानंतर हुआंगने तिचा फोन घेतला आणि मोबाईल चेहऱ्यासमोर ठेवून लॉक उघडला. यानंतर त्यांनी मोबाईलमध्ये असलेल्या अलीपे मधून १८ लाख रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले. एवढेच नाही तर हुआंगने AliPay चा पासवर्डही बदलला. डोंग हिला शुद्ध आल्यानंतर ही बाब कळताच तिने पोलिसांत तक्रार दिली.

आणखी वाचा : विमानात डान्स करणाऱ्या ‘त्या’ एअर हॉस्टेसचा नवा VIDEO VIRAL; Jugnu Dance चॅलेंज स्वीकारून साऱ्यांना केलं घायाळ

तक्रार आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. हुआंगला एप्रिलमध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. अलीकडेच, न्यायालयाने हुआंगला दोषी ठरवले आणि त्याला साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : घाबरून मुलगी म्हणाली, “माझं अजुन लग्न झालेलं नाही”, यावर उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल

बॉयफ्रेंडला जुगाराचं होतं व्यसन
हुआंगला जुगाराचंही व्यसन होतं, त्यामुळे त्याच्यावर लाखो रुपयांचे कर्ज होतं. या नादात त्याने गर्लफ्रेंडच्या खात्यातून पैसे चोरी करण्यापर्यंत त्याची मजल गेली. मात्र, या विचित्र घटनेनं संपूर्ण जगभरात एकच चर्चा रंगलीय. सोशल मीडियावर सध्या या घटनेबाबत नेटकरी आपआपले मत व्यक्त करताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asian countries boyfriend lifted eyelids of girlfriend as she slept and stole rs 18 lakh using her huawei phone facial recognition prp

ताज्या बातम्या