scorecardresearch

Premium

व्वा कमाल आजी! रेशीम कपड्यावर विणली भली मोठी श्रीमद भगवद्गीता; Video पाहून युजर्सने केले कौतुक म्हणाले….

आजींनी दोन वर्षात श्रीमद भगवद्गीतेमधील अशाप्रकारे अनेक श्लोक रेशमी कापडावर तयार केले आहेत.

assam 62 year old woman hemoprova weaved entire bhagavad gita in english sanskrit on silk cloth video viral
व्वा कमाल आजी! रेशीम कपड्यावर विणली भली मोठी श्रीमद भगवद्गीता; Video पाहून युजर्सने केले कौतुक म्हणाले…. (फोटो – emirateslovesindia आणि otherground.with.sai instagram)

छंद ही एक अशी गोष्ट आहे. ज्यातून व्यक्ती इतरांना शक्य होणार नाही अशी गोष्टही सहजपणे करुन दाखवू शकतो. या छंदामुळेच अनेकांना स्वत:ची एक वेगळी ओळख मिळते. अशाप्रकारे आसामच्या जोरहाटमध्ये राहणाऱ्या हेमप्रभा नावाच्या ६२ वर्षीय आजींनी लहानपणी हातमागावर कपडे विणकाम करून कापड बनवणे शिकले. पण कालांतराने हे विणकाम त्यांचा छंद बनला. पण हाच छंद जोपसत त्यांनी अशी एक गोष्ट घडवली आहे ज्याची आता जोरदार चर्चा होत आहे. या आजींनी हातमागाच्या साहाय्याने रेशमी कापडावर भगवद्गीतेचे श्लोक विणकाम करत तयार केले आहेत, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

कापडावर विणकामातून तयार केले भगवद्गीचे श्लोक

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या आजी हातमागाच्या साहाय्याने कापडावर विणकाम करताना दिसत आहेत. अशाचप्रकारे विणकाम करत त्यांनी रेशमी कापडावर संस्कृत, इंग्रजी आणि आसामी भाषांमध्ये भगवद्गीतेचे श्लोक तयार केले आहेत. हेमप्रभा आजींनी विणकामातून तयार केलेल्या या गोष्टीचा यापूर्वी कोणी विचारही केला नसेल.

lata-mangeshkar
आयोध्येच्या राम मंदिरात गुंजणार लतादीदींचे स्वर; उद्घाटनासाठी दीदींनी रेकॉर्ड केलेले खास भजन व श्लोक
The woman was misbehaved by the cab driver and she jumped from the moving vehicle
Video : धक्कादायक प्रकार ! कॅब ड्रायव्हरने केली गैरवर्तणूक अन् महिलेने चालत्या गाडीतून मारली उडी…
Vaidehi
“सचिन पिळगावकरांबरोबर काम करताना…,” वैदेही परशुरामीने सांगितला अनुभव, वैशाली सामंत, आदर्श शिंदेंचा उल्लेख करत म्हणाली…
dilip-joshi-jethalal
खऱ्या आयुष्यात ‘जेठालाल’ खूप उद्धट? चाहत्याने सांगितला दिलीप जोशींचा आलेला अनुभव

त्यांनी २ वर्षात २५० फूट लांब कापडावर संस्कृतमध्ये भगवद्गीता तयार केली. यानंतर त्यांनी कापडावर आसामी आणि इंग्रजी भाषेत भगवद्गीतेचे श्लोकही विणले. मात्र इंग्रजीतील श्लोक त्यांना वाचता येत नाही. इंग्रजी आणि संस्कृत भाषेतील जवळपास ७०० श्लोक त्यांनी अशाप्रकारे कापडावर विणले आहेत.

वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद करण्याची मागणी

emirateslovesindia आणि otherground.with.sai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत सुमारे ७० हजार लोकांनी लाईक केले असून २५ हजारांहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेक युजर्सनी हेमप्रभा आजींच्या कामाचे कौतुक केले आहे. एका यूजरने म्हटले की, त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे. तर दुसर्‍या युजरने म्हटले की, त्यांचे नाव खरचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले पाहिजे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Assam 62 year old woman hemoprova weaved entire bhagavad gita in english sanskrit on silk cloth video viral sjr

First published on: 01-10-2023 at 19:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×