Assam Floods Viral Video Fact Check : गेल्या महिनाभरापासून आसाममध्ये विनाशकारी पुराची स्थिती कायम असून, या पुरामुळे १०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे आणि हजारो नागरिकांना फटका बसला आहे. जुलैच्या अखेरीस झालेल्या मुसळधार पावसासह वरच्या भागात झालेल्या ढगफुटीमुळे सुरू झालेली ही परिस्थिती अद्यापही गंभीर आहे. ४३३ गावे अजूनही पाण्याखाली असून, मोठ्या प्रमाणावर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.
याचदरम्यान लाईटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचे आढळले. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पूर आलेल्या रस्त्यावरील एका खराब झालेल्या मशिदीवर अजान देताना दिसत आहे. काही सोशल मीडिया पोस्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा व्हिडीओ आसाममध्ये नुकत्याच आलेल्या पुराचा आहे.
तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ एआय-जनरेटेड आहे आणि अलीकडचा नाही.
काय होत आहे व्हायरल?
@The Live Tv सच सबसे आगे या फेसबुक पेजने एका खोट्या दाव्यासह हा व्हिडीओ त्यांच्या पेजवर शेअर केला आहे.
इतर युजर्सही असाच दावा करून हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास
आम्ही प्रथम व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण करून तपास करायला सुरुवात केली. व्हिडीओमध्ये काही विसंगती दिसून आल्या. उदाहरणार्थ, अजान देणाऱ्या व्यक्तीचा अजिबात तोल गेला नाही. यावरून हा व्हिडीओ एआय-निर्मित असू शकतो असा अंदाज लावण्यात आला आहे.
त्यानंतर आम्ही हा व्हिडीओ डाउनलोड केला आणि गुगलच्या सिंथआयडी (Google’s SynthID) द्वारे तपासला.
SynthID हे AI ने तयार केलेला मजकूर ओळखण्यासाठी त्यात अदृश्य डिजिटल वॉटरमार्क जोडणारे तंत्रज्ञान/टूल आहे. यामुळे एखादा मजकूर, व्हिडीओ AI-निर्मित आहे की नाही हे ओळखण्यास मदत होते, त्यामुळे SynthID डिटेक्टरने सांगितले की, हा व्हिडीओ गूगल एआय (Google AI) च्या माध्यमातून बनवला आहे.
आम्ही हा व्हिडीओ HIVE Moderation या दुसऱ्या एआय कंटेंट डिटेक्टरद्वारेदेखील तपासला. या टूलनेही व्हायरल झालेला व्हिडीओ एआयनिर्मित असल्याची पुष्टी केली.
निष्कर्ष
आसाममधील नुकत्याच आलेल्या पुरादरम्यान नुकसान झालेल्या मशिदीवरून एका व्यक्तीने अजान दिल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ AI-निर्मित आहे. पुराचे दृश्य बनावट आहे.
